प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्नाने आत्महत्या केल्याचे समोर आहे. हैदराबाद येथे अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्ना हिने काल हैदराबादमध्ये आत्महत्या केली. दुपारी १२ वाजता हा प्रकार घडला, याबाबत गचीबोवली पोलिसांना फोन आला. पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तिच्या पतीसह हवालदारांनी अनेक वेळा तिचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. अखेर त्यांना दरवाजा तोडावा लागला असता अभिनेत्रीचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.
पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. शोभिताचा मृतदेहही पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा खुनाच्या दृष्टिकोनातूनही तपास करत आहेत. अभिनेत्रीने 'एराडोंडाला मुरू', 'एटीएम' सारख्या अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले होते.
शोभिता ३० वर्षांची असून शोभिता ही कर्नाटकातील हसन जिल्ह्यातील सकलेशपूर येथील रहिवासी होती आणि गेल्या २ वर्षांपासून पतीसोबत हैदराबाद येथे राहत होती.