अलिबाग, ( धनंजय कवठेकर) : चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ४ डिसेंबर रोजी येणाऱ्या राष्ट्रीय जंतनाशक दिवस कशा पद्धतीने साजरा करावयाचा आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहे यासंदर्भात आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, गटप्रवर्तक यांच्या उपस्थितीत जनजागृती कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी वैद्यकीय अधिकारी प्रा. आ. केंद्र चिखली डॉ.औदुंबर कोळी, डॉ. विशाखा पाटील, वरिष्ठ औषध उपचार पर्यवेक्षक अलिबाग किर्तिकांत पाटील, एक्स-रे टेक्निशियन उन्नती भगत, आरोग्य सहाय्यक जितेंद्र कोळी , अनिता कनोजे, सरोजिनी म्हात्रे, गुलशन सिस्टर, सामाजिक कार्यकर्ती जिविता पाटील, गटप्रवर्तक नूतन पाटील इ. मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. औदुंबर कोळी यांनी उपस्थित अंगणवाडी तसेच आशा सेविकांना दिनांक ४ डिसेंबर रोजी येवू घातलेल्या राष्ट्रीय जंतनाशक दिवस तसेच जे लाभार्थी आजारपण किंवा इतर कारणास्तव जंतनाशक गोळी घेण्यापासून वंचित राहिले असतील त्यांना दिनांक १० डिसेंबर या दिवशी जंतनाशक गोळ्या देवून सदरील कार्यक्रम १००% यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच सेविकांच्या प्रश्नांचे निरसन केले. तसेच हा राष्ट्रीय कार्यक्रम पार पाडण्यासाठी सक्रिय सहभाग व आवश्यक यंत्रणा काय असेल हे सांगून कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका तसेच आशा सेविका व आरोग्य सेविका यांना शुभेच्छा दिल्या.