केंद्रीय मंत्री अमित शहांविरोधात दिव्यात शिवसेनेचे आंदोलन


डॉ. आंबेडकरांवरील बेताल वक्तव्याचा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून निषेध 


दिवा,  (आरती परब) : केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या बेताल वक्तव्यावरील निषेधार्थ शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वखाली निषेध आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याविरोधात आक्रोश व्यक्त केला. 

यावेळी युवासेना शहर अधिकारी अभिषेक ठाकूर, उपशहर प्रमुख तेजस पोरजी, विधानसभा संघटीका योगिता नाईक, शहर संघटीका ज्योती पाटील, शहर  समन्वविका प्रियांका सावंत, उपशहर संघटीका स्मिता जाधव, काँग्रेसचे सुरेश भोईर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे दिपक मोहिते, किरण ताटे, ज्योती पाटील, विभाग प्रमुख चेतन पाटील, हेमंत नाईक, संजय जाधव, शनिदास पाटील इतर पदाधिकारी कार्यकर्ते आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post