महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्हा कुस्ती संघांची निवड

 



अलिबाग (धनंजय कवठेकर) ः महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याचा कुस्ती संघ निवडण्यात आला आहे. रविवार ( दि. 29) अलिबाग तालुक्यातील वाडगाव येथे रायगड जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातून रायगडचा संघ निवडण्यात आला. 


          रायगड जिल्हा कुस्तीगीर संघ, जय हनुमान तालीम संघ वाडगाव व ग्रामस्थ मंडळ वाडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने खासदार सुनील तटकरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र वाडगाव येथे ही स्पधा्र आयोजित करण्यात आली होती.  सब ज्यूनियर मुले , सब ज्यूनियर मुली , खुला गट  पुरुष गादी व माती, महिला खुलागट , पुरुष खुला गट  ग्रिक्रोरोमन, बालगट मुले, बालगट मुली अशा गटांमध्ये  ही स्पर्धा खेळविण्यात आली. या गटांमधील विजेत्यांची महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी रायगड जिल्ह्याच्या संघात निवड करण्यात आली, अशी महिती रायगड जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष जयंद्र भगत यांनी दिली.


          या निवड चाचणी  कुस्ती स्पर्धेसाठी  श्रीराम पाटील, विष्णू पाटील, राजाराम कुंभार,  वैभव मुकादम, सुनील नांदे, प्रसन्न पाटील,सावळाराम पायमोडे, रवींद्र घासे, सुधाकर पाटील, प्रवीण भोपी, जितेंद्र गावंड, भालचंद्र भोपी,  योगेश गायकर, नाना राणे, श्रीराम दोंदल सर, यतीराज पाटील, रोशनी परदेशी यांनी पंच म्हणून  काम पाहिले.  स्पर्धा यशस्वी करण्यासाठी जय हनुमान तालीम संघाचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकूर,उपाध्यक्ष गोपीनाथ  ठाकूर, गणपत पवार, नथुराम म्हात्रे,नरेश कडू, नरेश थळे,रमेश भगत सर, रवींद्र ठाकूर सर, सुनील थळे सर, प्रवीण भगत, मिलिंद भगत, प्रकाश भगत, नितीन पाटील, संकेत लाखण, हेमंत लाखण, तसेच मंडळाचे अन्य सदस्य व सर्व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू

सब ज्युनियर गट मुलगे : 45 किलो. विश्वजीत संभाजी गोदे,  48 किलो.अभिषेक सुखदेव साह  , 51 किलो. सिद्धार्थ किरण भोपी.  55 किलो. संचित संतोष गायकवाड.  60 किलो. वेदांत एकनाथ पाटील. 65 किलो. निखिल विश्वनाथ भोपी. 71 किलो. विकास सुशील यादव.  80 किलो. संस्कार किसन शिंदे.  92 किलो. कृपेन श्रीधर पावशे. पनवेल, 110 किलो.पियुष विकास भगत.

   पुरुष खुला गट, गादी विभाग  (फ्रीस्टाइल) : 57 किलो. विजय बळीराम धुळे.  61 किलो. संकेत रघूनाथ कुंभार, 65 किलो. सुरज माधव जोशी. 70 किलो. रोशन दत्तू धुळे , 74 किलो. प्रतीक गजानन हातमोडे.  79 किलो. दिवेश दत्तात्रय पालांडे.  86 किलो. शुभम देवेंद्र म्हात्रे.  92 किलो. श्रेयस सुनील करे. 97 किलो. कुलदीप केशव पाटील. 125 किलो केसरी गट. कुणाल तुळशीराम धुळे. 

  पुरुष खुला गट  माती विभाग (फ्रीस्टाइल) :57 किलो. निकेश रामचंद्र धुळे ,  61 किलो. रोशन उत्तम धुळे ,  65 किलो. साजन चाहू पावशे , 70 किलो. किरण नामदेव ढवळे , 74 किलो. प्रवीण हिरो धुळे ,  79 किलो.जयेश अरुण खरमारे , 86 किलो. यश कृष्णा कडवे , 92 किेलो. शुभम दत्तात्रय वरखडे,  97 किलो. अंश अमर धोंडसेकर  125 किलो केसरी गट. निमिश नितीन घरत 

 पुरुष खुला गट (ग्रीको रोमन कुस्ती) : 55 किलो. चिराग अनंत गायकवाड ,  60 किलो. राज सुभाष पाटील , 63 किलो.सुरज सिताराम झा,  67 किलो. शिव सुंदर रमेश साहू , 72 किलो. श्रेयस संतोष बोले , 77 किलो. विशाल सिताराम पुजारी ,82 किलो प्रशांत परशुराम पाटील 87 किलो. विनायक पाल ,97 किलो. मयूर महादेव कोकरे ,  130 किलो.सोहम धनेश म्हात्रे. 

 सब ज्युनियर मुली : 40 किलो.नेहा श्याम राठोड ,  43 किलो. ऋतुजा राजेंद्र मरागजे,  46किलो.राजनंदिनी अंकुश जुंधळे  49 किलो. साची कमलेश मोहिते ,  53 किलो. प्रणाली ईश्वर घनवट ,  57 किलो. लावण्या दिलीप देशमुख ,  61 किलो. वेदिका संजय थोरात ,  73 किलो. श्रावणी देवानंद चेरकर .   

महिला खुला गट : 50 किलो. पायल संतोष मरागजे ,  53 किलो.वैष्णवी मनोहर कुंभार , 55 किलो. सुरभी अजित पाटील ,  57 किलो. प्राप्ती प्रतीक पाटील ,  59 किलो. वैष्णवी गोपाळ वैद ,  62 किलो. प्रांजली राजाराम कुंभार ,  65 किलो. अमेघा अरुण घरत ,  68 किलो. रितिका मच्छिंद्र कराडे ,  72 किलो. भाग्यश्री अनंत पाटील  76 किलो केसरी गट. सुरक्षा प्रदीप थळे.

Post a Comment

Previous Post Next Post