कोल्हापूर, ( शेखर धोंगडे) : रब्बी हंगाम १ डिसेंबर २०२४ पासून संपूर्ण महाराष्ट्रात सुरू होत असून, शेतकऱ्यांना पीक पाहणी करण्याकरिता आधी ई-पीक पाहणी मोबाईल ॲप उपलब्ध होते. परुंतु आता केंद्र शासनच्या सूचनेप्रमाणे त्यामध्ये काही तांत्रिक दुरुस्ती करून नवीन रूपात ई-पीक पाहणी DCS संपूर्ण राज्यात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. यानंतर १००% पीक पाहणी नवीन सुधारित ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे.
शेतकरी स्वत: पिकांची नोंद ई-पीक पाहणी मोबाईल ॲप द्वारे नोंदवायचे व उर्वरित पीक पाहणी जे शेतकऱ्यांनी नोंदविलेली नाही ते तलाठी यांच्या मार्फत होत असायची. त्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांना हंगामाच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी करण्या करिता सहाय्यक यांची नेमणूक करण्यात येत आहे. प्रत्येक गावासाठी १ सहाय्यक उपलब्ध राहणार असून सहाय्यकमार्फत पीक नोंदणी होणार आहे.
पीक विमा, पीक कर्ज, नैसर्गिक आपत्ती, MSP अंतर्गत पिकांची नोंद इत्यादी सुविधांचा लाभ घेण्यासाठी ई-पीक पाहणी DCS मोबाईल ॲपमध्ये पिकांची नोंद असणे आवश्यक आहे. नवीन मोबाईल ॲप मधील आवश्यकता पीक पाहणीसाठी निवडलेल्या गट क्रमांकापासून ५० मीटरच्या आत फोटो घेणे अनिवार्य पिकांचे दोन फोटो घेणे बंधनकारक आहे.
सुधारित मोबाईल ॲपमधील नवीन सुविधा शेतकऱ्यांच्या पीक पाहणी मदतीसाठी हंगाम सुरू होण्याच्या पहिल्या दिवसापासून पीक पाहणी संबधित समस्या सोडविण्यासाठी सहाय्यक उपलब्ध असेल. जिल्ह्यातील शेतकरी बंधू-भगिनींना याद्वारे आवाहन करण्यात येत आहे की, आपण आपली पीक पाहणी ठराविक मुदतीत करून घ्यावी जेणेकरून कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता अडचण येणार नाही.