कल्याण, ( शंकर जाधव ) : कल्याण (पश्चिम) ३/क प्रभाग क्षेत्रातील मालमत्ता कराची रक्कम थकीत असलेल्या मालमत्तांना वारंवार नोटीस देवूनसुध्दा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड़ यांचे निर्देशानुसार आणि कर निर्धारण व संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३/क प्रभागाचे सहा.आयुक्त धनंजय थोरात व अधिक्षक उमेश यमगर यांच्या पथकाने रक्कम रु. ३६,४४,८३५/- इतक्या पोटी मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई नुकतीच केली.
यामध्ये कल्याण (पश्चिम) गोविंदवाडी येथील मुसा बिल्डींग मधील शेख मुसा शेख नासीर यांच्या मालमत्ता क्र.C03016911700रक्कम रु. १०,६६,३७५/- थकबाकीपोटी दुकान क्र. १,२,३ व ५ सील करण्यात आले. कल्याण (पश्चिम) आग्रा रोड येथील बोरगांवकर टॉवरमधील धुरापतारी बी.गुप्ता यांच्या मालमत्ता क्र. C01012856400/004 रक्कम रु. ९१,५३२/- थकबाकीपोटी सील करण्यात आले.
कल्याण (पश्चिम) आगरा रोड येथील ममता टॉवरमधील ईश्वरलाल एल.वेलाणी, एम.आर.पटेल, एस.आय.वेलाणी आणि एन.आर.रंगाणी यांच्या मालमत्ता क्र. C01014226100/ऑफीस-१ रक्कम रु. ३,१६,७८०/- थकबाकीपोटी सील करण्यात आले. कल्याण (पश्चिम) टिळक चौक येथील लेले आळी येथील स्वप्निल भाऊराव ईरांडे यांच्या मालमत्ता क्र. C01012073100/101-A रक्कम रु. १७,८९,४९९/- थकबाकीपोटी सील करण्यात आले.
कल्याण (पश्चिम) टिळक चौक येथील लेले आळी येथील केतन मनोहर मांडे यांच्या मालमत्ता क्र. C01012073100/SHOP-४ रक्कम रु. १७,८९,४९९/- थकबाकीपोटी सील करण्यात आले. तसेच कल्याण (पश्चिम) लाल चौकी परिसरातील बारकु धोंडू ठाकरे यांचे मालमत्ता क्र. C02000626500 रक्कम रु. ३,०७,७३६/- थकबाकीपोटी सील करण्यात आली