Two - wheelers Sales : भारतात Hero MotoCorp अव्वल स्थानावर



Hero MotoCorp ची नोव्हेंबरमध्ये ४,३९,७७७ युनिट्ची विक्री

मुंबई: भारतात दुचाकीला अधिक महत्त्व असल्यामुळे त्याची मोठ्या प्रमाणावर विक्री होते. मोटारसायकलची क्रेझ खेड्यापासून शहरापर्यंत पाहायला मिळते. गेल्या महिन्याच्या नोव्हेंबर महिन्यातील विक्रीच्या आकड्यावर नजर टाकली तर, भारतात Hero MotoCorp ची घसरण होऊनही, ती अव्वल स्थान प्राप्त करण्यात यशस्वी झाली आहे.  याशिवाय Honda, TVS, Bajaj आणि Royal Enfield सारख्या इतर कंपन्यांनी देशांतर्गत विक्री आणि निर्यात दोन्हीमध्ये चढ-उतार अनुभवले आहेत.


नेहमीप्रमाणे, हिरो मोटोकॉर्प विक्रीच्या बाबतीत आघाडीवर राहिली. नोव्हेंबरमध्ये ४ लाखांहून अधिक वाहनांची विक्री करून या ब्रँडने होंडा, बजाज आणि TVS सारख्या कंपन्यांना मागे टाकले आहे. Hero MotoCorp ने नोव्हेंबर महिन्यात ४,३९,७७७ युनिट्सच्या विक्रीसह आपले पहिले स्थान कायम राखले आहे. तथापि, Hero MotoCorp ने गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये ४,७६,२८६ युनिट्सची विक्री केली होती, त्या तुलनेत ७.६७ टक्के घट नोंदवली गेली आहे. जर आपण ऑक्टोबर २०२४ च्या विक्रीवर नजर टाकली तर ३३.०७ % ची प्रचंड मासिक घट नोंदवली गेली होती. 


Honda बद्दल बोलायचे तर नोव्हेंबर महिन्यात देशांतर्गत बाजारात  ४,३२,८८८ वाहने विकली गेली आहेत. मागील वर्षी याच कालावधीत विक्री झालेल्या ४,२०,६७७ युनिटच्या तुलनेत २.९० टक्के वाढ झाली आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत मासिक आधारावर कंपनीच्या विक्रीत  २१.७४ टक्के घट झाली आहे. TVS मोटरने मागील महिन्यात नोव्हें•बरमध्ये ३,०५,२०३ वाहनांची विक्री केली, जी गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमधील २,८७,०१७ युनिटच्या तुलनेत ६.३४ टक्क्यांनी वाढली आहे. तथापि, ऑक्टोबरच्या तुलनेत, मासिक विक्रीत २१.८४ % ची घट झाली आहे.


नोव्हेंबर महिन्यात रॉयल एनफिल्डची आकडेवारी पाहिली तर ती  ७२,२३६ वाहनांपर्यंत मर्यादित होती. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ३.८६ टक्के आणि ऑक्टोबरच्या तुलनेत २९.१० टक्के कमी आहे. बजाज ऑटोने नोव्हेंबरमध्ये २,०३,६११ वाहनांची विक्री केली आहे. कंपनीची लोकप्रियता पल्सर, प्लॅटिना आणि फ्रीडम सीएनजी सारख्या मॉडेल्सवर अवलंबून आहे. प्रमुख दुचाकी उत्पादकांनी नोव्हेंबरमध्ये  १५,३२०४८ वाहनांची विक्री केली आहे, जी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये विकल्या गेलेल्या  १५, ५०,८४९ वाहनांपेक्षा १.२३ टक्के कमी आहे. मासिक पाहिल्यास, ऑक्टोबरमध्ये २०. ६३,३८७ युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत २५.८५ टक्क्यांनी मोठी घट झाली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post