काही राज्यात पूढील दोन दिवस पावसाचा इशारा
नवी दिल्ली : पश्चिम हिमालयीन राज्यांमध्ये गोठवणारी थंडी सुरू झाली आहे. जम्मू-काश्मीर, लडाख आणि हिमाचल प्रदेशमध्ये अनेक ठिकाणी पारा शून्याच्या खाली गेला आहे. त्याचबरोबर उंच शिखरांवरील धबधबे गोठल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. राजस्थानच्या वाळवंटी राज्यातही पारा ४० अंशांपर्यंत पोहोचला आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील दोन दिवस पावसाचा इशारा दिला आहे. यासोबतच सोमवारपासून उत्तर भारतातील बहुतांश भागात थंडीची लाटही सुरू होणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
सोमवारी पंजाब, हरियाणा आणि दिल्ली-एनसीआरमध्ये हलका पाऊस पडेल आणि त्यानंतर थंडीची लाट येईल असे जाहीर करत मध्य पाकिस्तान आणि त्याच्या आसपास तयार झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानात हा बदल झाला आहे. त्याच्या प्रभावामुळे रविवारीही दिल्ली-एनसीआरच्या काही भागात हलका पाऊस झााल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले.
रविवारी जारी करण्यात आलेल्या आपल्या ताज्या अंदाजात, भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) ने म्हटले आहे की ९ डिसेंबरपासून उत्तर भारताच्या बहुतांश भागात थंडीची लाट येईल. आयएमडीचे शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी सांगितले की, सोमवारनंतर दिल्ली-एनसीआरमध्ये तापमानात घट होईल. राजस्थानमधून थंडीची लाट सुरू होणार आहे. पश्चिम राजस्थानमध्ये ९ ते १४ डिसेंबरपर्यंत थंडीची लाट कायम राहणार आहे. त्यानंतर ११ डिसेंबरपासून पंजाब, हरियाणा-चंदीगड आणि पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये थंडीच्या लाटेचा प्रभाव दिसून येईल. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातही तापमानात घट झाल्याने थंडीचा प्रादुर्भाव वाढणार आहे. निराधार आणि बेघर लोकांना थंडीपासून वाचवण्यासाठी दिल्लीतील एम्स, लोधी रोड आणि निजामुद्दीन फ्लायओव्हरजवळ रात्र निवारा बांधण्यात आला आहे.
IMD नुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, झारखंड, सिक्कीम आणि हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये ९ डिसेंबर रोजी रात्री उशिरा आणि सकाळच्या वेळी दाट धुके असेल. या काळात पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग आणि कालिम्पाँग आणि पंजाब आणि हरियाणामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो.
Tags : #IMD #weather #punjab #Delhi