मानपाडा पोलिसांची कामगिरी
डोंबिवली ( शंकर जाधव ) : डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटनात वाढ होत आहे. पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना उल्हासनगर येथून अटक करून गजाजाड केले. या सराईत चोरट्यांनी २ लाख ७० किमतीच्या चार मोटारसायकल मानपाडा पोलीस ठाणे, कोळसेवाडी पोलीस ठाणे, एनआरआय पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीतून चोरी केल्या.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रितिक शरद बाविस्कर (१९) व वर्षे कुणाल कृष्णा नायडु (१९) असे अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. मानपाडा पोलीस ठाणे हद्दीत मोटारसायकल चोरीच्या घटना होत होत्या. पूर्व प्रादेशिक विभाग कल्याण अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव, कल्याण परिमंडळ -३ चे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे, डोंबिवली विभाग सहाय्यक पोलीस आयुक्त सुहास हेमाडे यांनी विशेष मोहिम राबविली. मानपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी विशेष पोलीस पथक तयार केले होते. या पथकातील पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार आधारे रितिक व कुणाल या सराईत चोरट्यांना उल्हासनगर येथून अटक करण्यात आली.
या सराईत चोरट्यांनी २ लाख ७० किमतीच्या चार मोटारसायकलमानपाडा पोलीस ठाणे, कोळसेवाडी पोलीस ठाणे, एनआरआय पोलीस ठाणे, नवी मुंबई हद्दीतून चोरी केल्या.