दिव्यातील लो प्राईस एनएक्सचा उपक्रम
दिवा, (आरती परब) : दिव्यात बेडेकर नगर येथील लो प्राईस एनएक्स व समाजसेवक ज्ञानेश्वर बेडेकर, सोहनलाल सिरवी यांच्या वतीने महिलांसाठी मोठ्या प्रमाणात हळदीकुंकूचे आयोजन करण्यात आले होते. या हळदी कुंकूच्या कार्यक्रमाला हजेरी लावत महिलांनी सौभाग्याचे वाण लुटले.
दिव्यातील लो प्राईज एनएक्स हे बेडेकर नगर येथील प्रसिद्ध आणि महिलांचे आवडते सुपर मार्केट आहे. दिवा पूर्वेतील विकास म्हात्रे गेट, गणेश नगर, बेडेकर नगर येथील महिला घरचे सर्व वान सामान येथून खरेदी करतात. त्यावर ही ७६ प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्ञानेश्वर बेडेकर, सोहनलाल सिरवी यांनी खरेदीसाठी महिलांना भरघोस सूट देत विविध वस्तूंची ऑफर उपलब्ध दिली होती. रात्री उशिरापर्यंत या हळदी कुंकू समारंभास महिला भेट देत होत्या. यावेळी ज्ञानेश्वर बेडेकर, सोहनलाल सिरवी, अरविंद भानुशाली, मयुर भानुशाली हे त्यावेळी उपस्थित होते.