दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी शिवसेना आक्रमक



शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष दिवा शहर प्रमुख सचिन पाटील यांचे शिक्षणाधिकारी कमलाकांत मेहेत्रे यांना निवेदन


दिवा, (आरती परब) :  दिवा शहरातील अनधिकृत शाळा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुख सचिन पाटील यांनी ठाणे महापालिका शिक्षणाधिकारी कमलाकांत मेहेत्रे यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात दिवा शहरातील अनधिकृत शाळा तसेच त्या शाळाचे संस्थाचालक यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे. ही प्रमुख मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे. या अनधिकृत शाळांमध्ये शिक्षणाचा दर्जा योग्य नसल्यामुळे मुलांच्या भविष्याचे नुकसान होत आहे. या  अनधिकृत शाळांवर लवकरात लवकर कारवाई केली नाही तर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शहर प्रमुख सचिन पाटील यांनी दिला. सोबत महिला शहर संघटीका ज्योती पाटील उपस्थित होत्या.



दिव्यातील अनधिकृत शाळेत लहान मुलीला झालेल्या छेडछाडीच्या प्रकारानंतर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षांतील शहर प्रमुख सचिन पाटील आणि महिला शहर संघटीका ज्योती पाटील यांनी या शाळांवर योग्य कारवाई साठी शिक्षणाधिकाऱ्यांकडे सलग एक ते दोन महिने पाठपुरावा सुरु आहे. आधी या अनधिकृत शाळा ४० ते ४५ होत्या. पण या वर्षी दिव्यात नव्याने अनधिकृत २५ शाळा सुरु झाल्याने मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न उभा राहत आहे. हे कुठे तरी थांबण्यासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्ष दिव्यातील अनधिकृत शाळा बंद करण्यासाठी आक्रमक होणार असल्याचे शहर प्रमुख सचिन पाटील यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post