पिण्याच्या पाण्याबाबतसनरायझ गॅलेक्सी इमारतीतील रहिवाशांचा आंदोलनाचा इशारा
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याणमधील सनरायझ गॅलेक्सी इमारतीतील रहिवाशांना अनेक दिवसांपासून पाणी समस्या भेडसावत आहे. कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेकडे अनेक वेळेला तक्रारीनंतर लक्ष देत नसल्याचे सांगत राहिवाश्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या अगदी जवळ सनरायझ गॅलेक्सी इमारत आहे.या इमारतीत ६० ते ७० कुटुंबे राहत आहेत. गेल्या आठ दिवसांपूर्वी या इमारतीची पाणीपुरवठा करणारी पाण्याची लाईन फुटल्यामुळे इमारतीतील पिण्याच्या नळातून घाण पाणी येत आहे. या पाण्यामुळे रहिवाशांमुळे काही राहिवाशी आजार पडले आहेत.
गेल्या आठ दिवसांपासून या इमारतीतील रहिवाशांनी महानगरपालिकेकडे तक्रार केली मात्र पालिका प्रशासानातील संबंधित विभागातील अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या इमारतीतील रहिवाशांना पैसे खर्च करून टँकरचे पाणी विकत घेण्याची वेळ आली. पिण्यासाठी पाणी देखील दररोज ३०० ते ४०० रुपये खर्च करुन विकत घ्यावे लागत आहे. दुसरीकडे आजरी पडल्याने उपचार व औषधांचा खर्च आणि पाणी विकत घेण्याचा खर्च वाढला आहे. पालिका प्रशासान पाणी बिल आकरते मग पाणी का देत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. पालिकेने त्वरित समस्या न सोडविल्यास आंदोलन करू असा इशारा दिला आहे.