कोल्हापूर-साताऱ्यातून ९१ किलो गांजा जप्त


तीन जणांना अटक ; २३,९०,०००/-रु. किमतीचा मुद्देमाल हस्तगत 


कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) :  स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूर पथकाने गोवा येथे १० किलो गांजा विक्री करण्यासाठी जात असलेल्या तरुणास बेड्या ठोकल्या असून त्याचबरोबर सातारा येथील त्याच्या साथीदाराकडून ८१ किलो गांजा असा एकूण ९१ किलो गांजा व इतर साहित्य मिळून २३,९०,०००/-रु. किमतीच्या मुद्देमालासह दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. 


 पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, यांनी अवैद्य व्यवसाय, अमली पदार्थ साठा तसेच विक्री करणारे गुन्हेगारांचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेश दिले आहेत. आदेशा प्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कोल्हापूरकडील सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे व पोलीस उप निरीक्षक जालिंदर जाधव यांची दोन पथके तयार करून अवैद्य व्यवसाय तसेच अमली पदार्थाचे अनुषंगाने माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, पोलीस अभिलेखावरील फैयाज मोकाशी गोवा येथे गांजा विक्री करण्यासाठी जाणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती.




मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दोन्ही पथकासह हायवे रोडवर उचगांव ब्रिजजवळ जाऊन सापळा रचून फैयाज अली मोकाशी ( ३७) यास सुमारे १० किलो गांजा अमली पदार्थ व डिओ मोपेड गाडीसह पकडले. त्याच्याकडे अधिक विचारपूस केली असता त्याने गांजा हा अमली पदार्थ सोहेल मोमीन (३३) याच्याकडून आणला असून सॅम पूर्ण नांव माहिती नाही रा. पणजी गोवा यास विकण्याकरिता जात असल्याचे सांगितले. सोहेल सलीम मोमीन यास सातारा येथून ताब्यात घेतले. त्यानंतर सोहेल मोमीन या विश्वासात घेवून त्याच्याकड विचारपूस केली असता त्याने समीर शेख (२१) याच्याकडून तो गांजा आणल्याचे सांगितले. त्यानंतर समीर उर्फ तौसिफ रमजान शेख यास सातारा येथील त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपूस केली असता त्याने गुन्हा केलेची कबुली दिली. तसेच गांजाबाबत अधिक विचारपूस केली असता त्याने गांजाचा साठा त्याच्या राहत्या घरामध्ये केल्याचे सांगितले. त्याच्या राहत्या घरातून सुमारे ८२ किलो गांजा हा अमली पदार्थ कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी तिन्ही आरोपीकडून एकूण ९१ किलो गांजा, डिओ मोपेड गाडी एक व तीन मोबाईल हँन्डसेट असा एकूण २३,९०,०००/-रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांच्यआ मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक  रवींद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रविण पाटील, गजानन गुरव, विशाल खराडे, संतोष बरगे, योगेश गोसावी, महेंद्र कोरवी, प्रदिप पाटील, अशोक पोवार, परशुराम गुजरे, संजय पडवळ, कृष्णात पिंगळे, शिवानंद मठपती, नामदेव यादव, अनिल जाधव, यशवंत कुंभार व हंबीरराव अतिग्रे यांनी केली आहे.




Post a Comment

Previous Post Next Post