उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या ठाणे, नवीन पनवेलमध्ये शाखा



महाराष्ट्रातील ८२ शाखा आणि देशभरात १०४३ शाखांसह बँकेचे जाळे अधिक मजबूत


ठाणे/पनवेल : उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड (उत्कर्ष SFBL) ठाणे वागळे इस्टेट आणि न्यू पनवेल येथे दोन नवीन बँक शाखांचे उद्घाटन करत आहे. या विस्ताराद्वारे, बँकेने महाराष्ट्रातील शाखांची संख्या ८२ वर नेली असून देशभरातील शाखांचे जाळे १०४३ वर पोहोचले आहे.  हा विस्तार ठाणे आणि पनवेल येथील रहिवाशांना अत्यावश्यक बँकिंग सुविधा पुरवण्याच्या बँकेच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. 


उद्घाटनाबाबत बोलताना, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद सिंग म्हणाले की, ठाणे वागळे इस्टेट आणि न्यू पनवेल येथे नवीन शाखा उघडल्याने महाराष्ट्रातील आमचे नेटवर्क अधिक मजबूत होत आहे. ठाणे औद्योगिक विकासासाठी ओळखले जाते, तर न्यू पनवेल हे गजबजलेला निवासी आणि व्यापारी केंद्र असून नवी मुंबईच्या प्रगत भागाच्या जवळ आहे. या दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक आहेत. या विस्ताराद्वारे, आम्ही या भागातील समाजांचे आर्थिक गरजांकडे लक्ष देण्याचा आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करत आहोत."  उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, आर्थिक समावेशन आणि नाविन्यपूर्ण बँकिंग उपायांद्वारे, आपल्या ग्राहकांच्या स्वप्नांना पंख देत भारतभर प्रगतीचा प्रवास सुरू ठेवत आहे.


बँक आपल्या ग्राहकांना आर्थिक उत्पादने आणि सेवा प्रदान करणार असून, ज्यामध्ये बचत आणि चालू खाती, मुदत ठेवी आणि आवर्ती ठेवी यांचा समावेश आहे. आपल्या ग्राहकांच्या विविध आकांक्षा पूर्ण करण्यासाठी बँकेने गृहकर्ज, व्यवसाय कर्ज आणि मालमत्तेवर कर्ज यासारखी विविध कर्ज उत्पादने उपलब्ध केली आहेत.


बँकिंग शाखेमध्ये पायाभूत सुविधा, डिजिटल बँकिंग क्षमता आणि एटीएम नेटवर्कसह बँक एकात्मिक ग्राहक सेवा प्रदान करते. याशिवाय बँक इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग, युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि कॉल सेंटर यांसारखे अनेक बँकिंग माध्यमे पुरवते.


समाजातील इतर घटकांना सेवा देताना अल्प-बँकिंग कर्जे (जेएलजी कर्जे), एमएसएमई (मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राईझेस) कर्ज, गृहकर्ज आणि मालमत्तेवरील कर्ज यासह इतर विभागांमध्ये सेवा देत नसलेल्या आणि सेवा न मिळालेल्या ग्राहक वर्गांना आर्थिक सेवा प्रदान करणे, हे उत्कर्ष एसबीएफएलचे उद्दिष्ट आहे. तसेच बँक ग्राहकांना टॅबलेट-आधारित 'डिजी ऑन-बोर्डिंग' ॲप्लिकेशनद्वारे शाखेला भेट न देता बँक खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करते.




Post a Comment

Previous Post Next Post