![]() |
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभूंसह पदक विजेते खेळाडू |
मुंबई, ( ज्येष्ठ पत्रकार नारायण सावंत ) : तामिळनाडू येथे नुकत्याच पार पडलेल्या ६२ व्या राष्ट्रीय रोलर स्केटिग स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या खालील खेळाडूंनी पदके प्राप्त करून ठाकरे क्रीडा संकुलासह महाराष्ट्र राज्याचे नाव उज्वल केले आहे.
रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या( RSFI) तामिळनाडू येथील पोलाची शहरात, येथे नुकत्याच झालेल्या ६२ व्या राष्ट्रीय खेळांमध्ये प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या (PTKS) खेळाडूंनी अभूतपूर्व यश मिळवले.
खेळाडूंची कामगिरी पुढील प्रमाणे
वयोगट १४-१७ मुली सोलो
नायशा मेहता – सुवर्ण पदक
वयोगट ११-१४ मुली सोलो
रिदम ममानिया - सुवर्ण पदक
सिया नवले – रौप्य पदक
९-११ मुली (सोलो)
सिमाया पारेख - रौप्य पदक
वयोगट ७-९ मुली (सोलो)
समायरा नाडकर्णी - सुवर्ण पदक
रिया बांकडा – कांस्य पदक
वयोगट ७-९ फ्री स्केटिंग
समायरा नाडकर्णी – रौप्य पदक
वयोगट ११-१४ इनलाईन मुली
रिदम ममानिया – कांस्य पदक
वयोगट ९-११ कॅरोल ऑफ दी बेल्स
दिविशा बांकडा - कांस्य पदक
सिमाया पारेख
नायशा मेहता
आर्या थापर शर्मा
११-१४ मीस्टिकल ओपेट – सुवर्ण पदक
सिवा नवले
जीयारा जानी
रिदम ममानिया
सीया चुनेकर
वयोगट अंडर १४ - प्रीसीजन
बेला सेनोरीटा - सुवर्ण पदक
सिवा नवले
रिदम ममानिया
मायरा अरोरा
अवनी काटधरे
जियारा जानी
सीया चुनेकर
दिविशा बांकडा
सिमाया पारेख
आराईशा मेहता
वयोगट १४ – १७
ओम गुजराती - सुवर्ण पदक
२०२४ रोम, इटली येथे आयोजित जागतिक स्पर्धेत मानांकन क्रमांक -९. सर्वांना १०० टक्के विश्वास आहे की, इतर राज्यातील पदक विजेत्या खेळाडूंमधून २१व्या एशियन स्पर्धेसाठी या संकुलाच्या अनेक खेळाडूंची निवड भारतीयसंघात होईल असा विश्वास संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांनी व्यक्त केला.
प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू व सचिव डॉ. मोहन अनंत राणे यांचे पदक विजेत्या खेळाडूंच्या यशामध्ये विशेष सहकार्य लाभलेले आहे तसेच प्रशिक्षक आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पंच आदेश सिंग यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.