मुंबई, ( धनंजय कवठेकर ) : महिला आणि बालकांच्या उन्नतीसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण संवेदनशीलतेने काम करत आहे. आम्ही त्यांच्याशी संबंधित योजना आणि कार्यक्रमांची प्रभावी, पारदर्शक आणि दर्जेदार अंमलबजावणी सुनिश्चित करत आहोत जेणेकरून विकसित भारत-विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करता येईल, अशा भावना राज्याच्या महिला व बाल विकासमंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी केले आहे.
याप्रसंगी तटकरे यांनी महिला आणि बालकांच्या विकासाला गती देण्यासाठी प्रमुख भागधारकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न असून या शिबिरात सर्वांनी मिळून त्यांचे भविष्य अधिक सामर्थ्यवान बनविण्याचा विचार करूया जेणेकरून महिला आणि बालविकासाला नवी दिशा मिळेल. यावेळी महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती देत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सुसूत्रता आणावी अशी भावना व्यक्त केली. महाराष्ट्रातील बालकांच्या व महिलांच्या उन्नतीसाठी विविध मागण्यांचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दिला असून केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला पाठबळ मिळावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली. यावर केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला संपूर्ण सहाय्य दिले जाईल असे आश्वासन केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आश्वासन दिले आहे.
या चिंतन शिबिरात राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी, उपमुख्यमंत्री दिया कुमारी, केंद्रीय महिला व बालविकास राज्यमंत्री सावित्री ठाकूर आणि भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या महिला व बालविकास मंत्री यांच्या उपस्थितीत पार पडले.