आयुक्तांवरील भ्याड हल्ल्याचा दिवा प्रभाग समिती कर्मचाऱ्यांनी नोंदवला निषेध

 


दिवा,  (आरती परब) : दिव्याच्या दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर अतिक्रमणाच्या कारवाई दरम्यान अनधिकृत गाळेधारकाने भ्याड हल्ला केला. त्याचा निषेध नोंदवण्यासाठी दिवा प्रभाग समितीतील सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी दैनंदिनी काम बंद न करता हाताला काळ्या फिती बांधून जाहिर निषेध व्यक्त केला.



दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त भालचंद्र एकनाथ घुगे हे शीळ परिसरात अतिक्रमण केलेल्या गाळ्यावर कारवाईसाठी गेले असता तेथे त्या गाळेधारकाने भ्याड हल्ला केला. त्या भ्याड हल्ल्याचा आज दिवा प्रभाग समितीच्या सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी दैनंदिनी काम बंद न करता हाताला काळ्या फिती बांधून जाहिर निषेध नोंदवला. यात दिवा प्रभाग समितीतील अतिक्रमण विभाग, पाणी पुरवठा विभाग, कर वसुली विभाग, समाज विकास विभाग, जन्म- मृत्यु विभाग, लेखा विभाग, विद्युत विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, सुरक्षा विभाग, आस्थापना विभाग व घन कचरा व्यवस्थापन विभागातील सर्व अधिकारी- कर्मचारी यांनी जाहिर निषेध नोंदवला.




Post a Comment

Previous Post Next Post