कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील दुचाकी व चारचाकी चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच घडलेले गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच दुय्यम अधिकारी यांना सूचना दिल्या होत्या. सूचनांप्रमाणे एकूण पाच जणांच्या टोळीकडून ६०,००,००० रुपये किमतीच्या ०७ चारचाकी व ०५ दुचाकी मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
सूचनांप्रमाणे पोलीस अभिलेखावरील आरोपी नागेश शिंदे हा चोरीतील अशोक लेलँन्ड टॅम्पो घेवून जलसंपदा कार्यालयाच्या गेटजवळ येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने तपास पथकाने सापळा रचून आरोपी नागेश हनमंत शिंदे ( ३० ), संतोष बाबासो देटके ( ४० ) यांना अशोक लेलॅन्ड कंपनीचे पिकअप मालवाहतूक टॅम्पोसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांच्या ताब्यातील मालवाहतूक टॅम्पो हा चोरीचा असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अधिक तपास केला असता नागेश हनमंत शिंदे हा सराईत गुन्हेगार असल्याचे समोर आले. अधिक तपास केला असता त्यांनी सदर गुन्ह्यासह एकूण ०५ मोटारसायकल व ०६ चारचाकी वाहन चोरल्याची कबुली दिली.
आरोपी नागेश शिंदे याच्या माहितीनुसार आणखीन ०५ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या. तसेच त्यांचे साथीदार मुस्तफा सुपे महंमद ( ५० ), करीम शरीफ शेख ( ६४ ) यांना बंगळुरू येथून ताब्यात घेतल्यानंतर सदर आरोपींकडून चोरीचे ०२ अशोक लेलंड दोस्त टेंम्पो, ०२ मारुती सुझुकी कंपनीच्या इको, ०१ बोलेरो पिकअप व ०१ युंडाई वेरणा गाडी अशा एकूण ०६ चारचाकी गाड्या जप्त करण्यात आल्या. तसेच नमुद तपास पथकाने पुणे-बंगळुरू हायवे रोडवर लक्ष्मीटेकडी, कागल या ठिकाणी सापळा रचून आरोपी इमामसाब रसुलसाब मुलनवार ( ४५ ) याला ताब्यात घेवून त्याच्या कब्जातून ०१ अशोक लेलंड कंपनीचा चोरीचा टॅम्पो जप्त केला आहे, वरील सर्व आरोपीकडून एकूण चोरीची ०७ चारचाकी वाहने व ०५ मोटारसायकली असा एकूण ६०,००,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
आरोपी पैकी नागेश हनमंत शिंदे याच्या विरुध्द यापूर्वी दुचाकी व चारचाकीचे ९० गुन्हे, संतोष बाबासो देटके याच्या विरुध्द चारचाकी वाहन चोरीचे ०६ गुन्हे व करीम शरीफ शेख याच्या विरुध्द चोरीची वाहने विकत घेतलेबाबतचे ०४ गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपीकडून गुन्ह्यातील वाहने जप्त केली असून सदर गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित सो व अप्पर पोलीस अधीक्षक, निकेश खाटमोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस उपनिरीक्षक अतिश म्हेत्रे तसेच पोलीस अंमलदार रामचंद्र कोळी, सुरेश पाटील, महेश खोत, रुपेश माने, रोहीत मर्दाने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सर्जे, संजय कुंभार, सुशिल पाटील, राजेंद्र वरंडेकर तसेच सायबर पोलीस ठाणेकडील सचिन बेंडखेळे, सुरेश बाबर व महिला पोलीस अर्मलदार मिनाक्षी पाटील यांनी केली आहे.