कल्याण - शीळ रोडवर नवी मुबंई बसला आग

  



डोंबिवली ( शंकर जाधव ) : नवी मुंबईकडून कल्याण दिशेकडे धावणाऱ्या नवी मुंबई महानगर पालिकेच्या परिवहन उपक्रमाच्या एका बसला आग लागल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कल्याण - शीळ रोडवर घडली. बसमधून धूर निघत असल्याचे पाहताच प्रवासी बसमधून उतरले. 




पालिकेच्या 'ड' प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या हद्दीतील अग्निशमक दल केंद्राला माहिती मिळाल्यानंतर तेथून पलावा अग्निशमक दल केंद्राला कळविण्यात आले. येथून एक अग्निशमक बंब घटनास्थळी निघाले. ज्या ठिकाणी घटना घडली तेथे जवळ एका टँकरवाल्याने पाईपाच्या सहायाने आग विझवली. स्थानिक पोलीसही घटनास्थळी पोहचले अशी माहिती पलावा अग्निशमक दल केंद्र प्रमुख सूरज यादव यांनी दिली.




Post a Comment

Previous Post Next Post