अंबरनाथ शहरातील भाजप पदाधिकाऱ्यांची नियुक्ती


पूर्व व पश्चिम १ व २ मंडळाचा पदनियुक्ती सोहळा संपन्न

अंबरनाथ/ अशोक नाईक : राज्यात भाजपने संघटन पर्वाच्या माध्यमातून विक्रमी नवीन सदस्य नोंदणीची प्रक्रिया पार पाडल्यानंतर मंडळाध्यक्ष, जिल्हाध्यक्ष पदाची निवड भाजपचे महाराष्ट्र कार्यकारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केली. त्या अनुषंगाने अंबरनाथमध्ये ४४ हजाराहून अधिक नवीन सदस्य नोंदणी पर्व पार पाडत असताना नवनियुक्त भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब व भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील तसेच भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ शहर भाजप कार्यकारणीनुसार अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्षपदी विश्वजीत करंजुले पाटील व अंबरनाथ पश्चिम १ व २ चे मंडळ अध्यक्ष लक्ष्मण पंत व प्रदेश तेलंगे यांच्या नियुक्तीनंतर शहर कार्यकारणी पदाधिकारी नियुक्तीपत्र सोहळा गुरुवारी २२ मे रोजी सायंकाळी अंबरनाथ (पूर्व) बी केबिन  रोड येथील स्वानंद हॉलमध्ये पक्ष वाढीच्या दृष्टीने नवीन ऊर्जा घेत पार पडला. 


भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष पदासाठी आता वयाची अट व इतर निकष लागू केले आहेत. त्याचबरोबर निवड प्रक्रियेतही बदल केला आहे. भाजपने यंदा संघटन पर्व म्हणून जाहीर केले आहे. दरम्यान आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सदस्य नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मंडळाध्यक्ष जिल्हाध्यक्ष पदांची निवड प्रक्रिया सध्या सुरू आहे. त्या अनुषंगाने अंबरनाथ शहर क्षेत्र परिसरात भाजपाने अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्षपदी विश्वजीत गुलाबराव करंजुले पाटील तसेच अंबरनाथ पश्चिम परिसरात भाजप मंडळ-१ अध्यक्षपदी लक्ष्मण पंत व भाजप मंडळ-२ चे अध्यक्ष प्रदेश तेलंगे यांची नियुक्ती केली आहे. या तिन्ही मंडळाच्या अध्यक्षांनी आपल्या मंडळ कार्यकारिणीची घोषणा करत जिल्हाध्यक्ष नंदू परब व भाजपा प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या हस्ते  पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी तिन्ही मंडळाचे अध्यक्ष तसेच भाजपचे जेष्ठ कार्यकर्ते विजय खरे, भाजप कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील, माजी नगरसेवक अशोक गुंजाळ, वंदना पाटील, राजेंद्र कुलकर्णी, महिला मोर्चा भाजप प्रदेश सरचिटणीस रूपाली लठ्ठे, आदि पदाधिकारी तसेच आजी-माजी भाजपचे पदाधिकारी यांच्यासह नवनियुक्त पदाधिकारी यांच्यासह त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

   


या नवीन कार्यकारणी पदनियुक्ती सोहळ्याचे प्रास्ताविक युवा नेतृत्व भाजपाचे कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील यांनी करताना, भारतीय जनता पार्टी मुळातच पारिवारिक पक्ष आहे. जगात एक नंबर वर असलेल्या भाजपा पक्षात काम करण्याची संधी मिळाली आहे. अंबरनाथ शहरात परिवर्तन घडवायचं असेल तर एकजूट खूप महत्त्वाची आहे. अंबरनाथ शहरात ४४ हजार पेक्षा अधिक भाजपने नवीन सदस्य नोंदणी पार केली आहे. एकीची शिवसेना दुभंगलेली आहे. महायुती असो या नसो... अंबरनाथ नगरपालिकेत भाजपाचे कमळ फुलवण्याची वेळ येऊन ठेपल्याची अपेक्षा भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजीत करंजुले पाटील यांनी या पदनियुक्ती सोहळ्यात व्यक्त केली.या पदनियुक्ती सोहळ्याचे सूत्रसंचालन अंबरनाथ पूर्व मंडळाचे सरचिटणीस दिलीप कणसे यांनी केले.

  

अंबरनाथ पूर्व मंडळ शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले पाटील यांच्या प्रथम कार्यकारणी मध्ये एकूण ४५ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सरचिटणीस पदी दिलीप कणसे, राजेंद्र कुलकर्णी, दत्तात्रय देशमुख, वृंदा पटवर्धन तसेच महिला मोर्चा अध्यक्ष पदी कंचन मिश्रा, अंबरनाथ विधानसभा महिला मोर्चा संयोजक रोझलीन फर्नांडिस यांच्यासह इतर सेलमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच अंबरनाथ पश्चिम मंडळ-१ चे अध्यक्ष लक्ष्मण पंत यांच्या प्रथम कार्यकारणीत २४ सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सरचिटणीस पदी नरसीमूल बोलबंडा, रिचर्ड पीटर डिसिल्वा, ललित सुळे, देविका गारुंगे यांच्यासह इतर सेलमध्ये पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली तर अंबरनाथ पश्चिम मंडळ-२चे अध्यक्ष राजेश तेलंगे यांच्या प्रथम कार्यकारिणीमध्ये-१सदस्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सरचिटणीस पदी साईनाथ गुंजाळ प्रमोद गुप्ता, महिला मोर्चा अध्यक्षपदी पुनम जाधव व इतर सेल पदी कार्यकारिणी नियुक्त करण्यात आली.


अंबरनाथ पूर्व मंडळाचे शहराध्यक्ष विश्वजीत करंजुले पाटील यांनी  सर्वाना विश्वास दिला की, मी २४ तास आपल्यासाठी उपलब्ध असेन, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आज सर्वांनी एकीचा संकल्प करा असेही ते म्हणाले, पश्चिम मंडळ-२चे अध्यक्ष प्रजेश तलंगे यांनी शब्द दिला की, तुम्ही साथ द्या, आपण अंबरनाथ नगरपालिकेवर भाजपचा झेंडा लावूया, तर अंबरनाथ पश्चिम मंडळ-१चे अध्यक्ष लक्ष्मण पंत यांनी कार्यकर्त्यांना जोमाने काम करण्याचे आवाहन केले. भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील तसेच नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष नंदू परब यांनी ज्यांना पद मिळाले नसेल त्यांनी नाराज न होता, काम करण्याचा सल्ला दिला. ज्याला काम करावयाचे आहे, त्यांना देखील विविध सेलमध्ये आम्ही पदे देऊ असे आश्वासन दिले. या पदनियुक्ती सोहळ्यानंतर राष्ट्रगीत होऊन सांगता झाली. त्यानंतर आमरस पुरीच्या भोजनाचा आस्वाद घेऊन नवीन पदाधिकारी कार्यकरणीने भारत माता की जय,  वंदे मातरम घोषणा देत, नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.




Post a Comment

Previous Post Next Post