उल्हास नदीला पुन्हा प्रलयाची आठवण

 


उल्हास नदीला उधाण आल्याने २६ जुलैची आठवण

अंबरनाथ \ अशोक नाईक : मान्सूनपर्व २६ मे लाच २६ जुलै प्रलयाची आठवण करून देत उल्हास नदीला उधाण आल्याचे चित्र सोमवारी २६ मे ला बदलापूरकरांना पाहायला मिळाले. अंबरनाथ तालुक्यातील छोट्या-मोठ्या नदी,नाले खळबळून प्रवाहित झाले. बदलापूर, वांगणी, कर्जत रस्त्यावर पावसाच्या पाण्याची लहर आली. तर अंबरनाथ आणि बदलापूर शहरांमध्ये कल्याण-बदलापूर राज्य मार्ग तसेच बदलापूरमधील बेलवली भुयारी मार्ग पाण्याखाली आल्याने चार चाकी गाडी देखील बुडाली होती. काही वेळ वाहतुकीचा खेळखंडोबा झाल्याने पहिल्याच मान्सूनपूर्व २६ मेला नागरिकांना २६ जुलैच्या प्रलयाची आठवण उजागर झाली. 

रविवारी दिवसभर ढगाळ वातावरणात उष्म वाफारे जाणवत होते. गेले तीन-चर दिवस पावसाची सर पडत असताना अखेर रायगड जिल्ह्यातील कर्जत,माथेरान परिसरात तसेच बदलापूर, वांगणी, अंबरनाथमध्ये सोमवारी पहाटेपासून 'धडामधूम'आवाज करत मुसळधार पावसामुळे परिसर जलमय झाला. उल्हास नदीने उसांडी घेत बदलापुरात सकाळी ११ च्या सुमारास इशारा पातळी जवळ पोहोचली होती. त्यामुळे उल्हास नदी तीरावरील बदलापूरचा चौपाटी परिसर जलमय झाला होता. 


सोमवारी पहाटेपासूनच पावसाने जोर धरला, विजेच्या कडकडाटासह पावसामुळे उल्हास नदीच्या प्रवाहात जोर वाढवून पाण्याची पातळीत कमालीची वाढ झाली होती. बदलापूर मध्ये उल्हास नदीची पाणी पातळी १६.४६ मीटरपर्यंत उंचावली होती. त्यामुळे उल्हास नदी किनारी असलेल्या बदलापूर चौपाटी परिसर जलमय होऊन गेला! 

उल्हास नदीची इशारा पातळी ही १६.५० मीटर इतकी आहे तर धोकादायक पातळी १७.५० मीटर इतकी आहे. पावसाचा जोर राहिला तर नदीच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुळगाव- बदलापूर नगरपालिकेने अग्निशमन दल पथक आपत्कालीन परिस्थितीनुसार तैनात केल आहे उल्हास नदीतील वाढलेली पाण्याची पातळी पाहण्याकरिता मोठी गर्दी झाली होती. दरम्यान मान्सूनपूर्व २६ मे ला २६ जुलै च्या आसपास होणारी स्थिती मे महिन्यातच उद्भवल्याचे दिसून आल्याची चर्चा होऊ लागली आहे.



Post a Comment

Previous Post Next Post