अवाडा ऑटर्स स्क्वॉश खुल्या स्पर्धेत जेनेट विधी चमकली

 



मुंबई : ऑटर्स क्लब, वांद्रे येथे सुरू असलेल्या अवाडा ऑटर्स स्क्वॉश खुल्या स्पर्धेत जेनेट विधीने उत्कृष्ट खेळ करताना कॅरेन विनोदचा ११-१, ११-३, ११-३ असा सरळ गेममध्ये पराभव केला. अपवादात्मक शॉट प्लेसमेंट, मनगटाचे स्ट्रोकच्या जोरावर आगेकूच करीत तिने उपांत्यपूर्व फेरी निश्चित केली.



अन्य लढतींमध्ये, पूजा अर्थीने मनस्वी दत्तविरुद्ध ११-०, ११-१, ११-२ असा दमदार विजय मिळवला. रीवा निंबाळकरनेही आपले वर्चस्व राखत दुर्गा पारधीचा ११-५, ११-२, ११-५ असा पराभव केला.
महिला निकालः शमीना रियाझ विजयी वि. बिजली दरवडा ११-८, ११-३, ११-६,  महक तलाटी विजयी वि. मेहक गुप्ता ११-९, ११-९, ११-६; सुनीता पटेल विजयी वि. शिवानी शिरवाडकर ११-१,११-२,११-१.




Post a Comment

Previous Post Next Post