रिक्षाचालकांवर होणाऱ्या कारवाईविरोधात भाजपचा रिक्षाबंद आंदोलनाचा इशारा




रिक्षाचालकाला १२ हजार रुपये दंड आकारल्याप्रकरणी भाजप आक्रमक

 न परमिट, न बॅच आणि गणवेश नसल्यामुळे केलेली कारवाई योग्य असल्याचा वाहतूक पोलिसांचे स्पष्टीकरण


डोंबिवली ( शंकर जाधव ) :  डोंबिवलीतील एका रिक्षाचालकाला वाहतूक पोलिसांनी चक्क १२ हजार रुपयाचा दंड आकारल्याने रिक्षाचालक संतापले होते. हातावर पोट असलेल्या एक रिक्षाचालक एवढी रक्कम कशी भरणार? ही कारवाई करण्यामागे रिक्षाचालकांना त्रास देण्याचा हेतू होता का? रिक्षाचालकाने आपल्या कुटुंबाचे पोट भराव की दंडाची रक्कम भरावी? असे प्रश्न विचारून भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्याचवेळी रिक्षा बंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.


  डोंबिवली वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी एका रिक्षाचालकाला १२ हजार रुपयांचा दंड  आकारला. याची माहिती मिळताच भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब, भाजपा वाहतूक सेल कल्याण जिल्हा अध्यक्ष  दत्ता माळेकर, संजय राणे, संजय चेके, दीपक पवार, बाबू साळवे, इतर रिक्षाचालक हे डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा गांधी  चौकात एकत्र आले. वाहतूक नियंत्रण उपशाखा पोलीस निरीक्षक  श्रीराम पाटील यांची इंदिरा गांधी चौकात 

भेट घेऊन भाजपा पदाधिकाऱ्यांनी त्या रिक्षाचालकाला एवढा दंड लावणे म्हणजे त्या गरिबाने दंडाची रक्कम भरायची कशी असा प्रश्न उपस्थित होतो. वाहतूक पोलिसांनी त्या रिक्षाचालकावर केलेली कारवाई चुकीची आहे असे भाजपा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदू परब यांनी सांगितले.भाजपा वाहतूक सेल कल्याण जिल्हा अध्यक्ष दत्ता माळेकर म्हणाले, प्रामाणिकपणे रिक्षा चालवत तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. वाहतूक पोलीस जर दंडात्मक कारवाई करत असतील रिक्षाचालकांने जगायचं तरी कसे? या रिक्षाचालकावरील आकारलेला दंड कमी करा, अन्यथा रिक्षा बंद आंदोलन करू असा इशारा देण्यात आला. पोलीस निरीक्षक पाटील यांनी भाजपा पदाधिकाऱ्याचे म्हणणे ऐकले.

    याबाबत डोंबिवली वाहतूक नियंत्रण उपशाखा पोलीस निरीक्षक पाटील यांना विचारले असता त्यांनी त्या रिक्षाचालकाकडे चालविण्याचे परमिट व बॅच नाही. तसेच त्याने नियमाप्रमाणे गणवेश परिधान केला नव्हता, त्यामुळेच वाहतूक पोलिसांची कारवाई योग्य आहे.

Post a Comment

Previous Post Next Post