डोंबिवली ( शंकर जाधव ) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेचे माजी नगरसेविका संगीता मुकेश पाटील, पदाधिकारी मुकेश पाटील, उपविभाग प्रमुख किशोर सावंत, शाखाप्रमुख निलेश सावंत, उपशाखाप्रमुख जितेंद्र आरेकर, गणपत गावडे, चंद्रकांत रिंगे यांच्यासह अनेक पदाधिकारी, गटप्रमुख, कार्यकर्ते, महिला आघाडी यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत करत त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी शिवसेनेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विश्वनाथ राणे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.