ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंना महापालिकेतर्फे अभिवादन



कल्याण, ( शंकर जाधव ) : स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती दिनी शुक्रवारी महापालिका मुख्यालयात आयुक्त डॉ.इंदू राणी जाखड यांनी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.





या समयी उपायुक्त वंदना गुळवे, स्वाती देशपांडे- कुलकर्णी, संजय जाधव, महापालिका सचिव किशोर शेळके, कार्यकारी अभियंता शैलेश कुलकर्णी, अशोक घोडे, योगेश गोटेकर,अचिव्हर्स कॉलेजचे भिवंडीकर सर, महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, सहा.सुरक्षा अधिकारी सुरेश पवार तसेच अनेक महिला व पुरुष कर्मचारी वर्ग आणि उपस्थित नागरिक यांनी देखील सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले. महापालिका शाळांमध्येही शालेय विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.





Post a Comment

Previous Post Next Post