कोल्हापूर, ( शेखर धोंगडे ) : मे. सत्यसत्वा कन्स्ट्रक्शन तर्फे पार्टनर, निळकंठ एन शिंदे, रा. २०१, एफ बळवंत अपार्टमेंट, राजारामपुरी, कोल्हापूर (रिसनं 1823, 1822/ 1,1822/ 2,18223,1822/4,1822/5 यांचे हिस्सेपुर्ते सोबत जोडले मिळकत तपशिलाप्रमाणे) यांच्याकडून एकूण रक्कम १ लाख ५० हजार + व्याज जिल्हा ग्राहक तक्रार मंच कोल्हापूर यांचेकडील केस क्र. १३७/२००१ (ग्राहक वसुली अर्ज क्र. १२६/१६) व १३८/२००१ (ग्राहक वसुली अर्ज क्रं. १२५/१६) मधील आदेशातील कं. ३,४ व ६ मध्ये नमूद होणारी रक्कम भरली नाही तर नमुद केलेली मालमत्ता दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता दुपारी ३.०० वाजण्याच्या सुमारास तहसीलदार कार्यालय करवीर येथे वाजता किंवा जाहीर लिलावाने विकली जाईल, अशी माहिती करवीरचे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी दिली आहे.
मे. सत्यसत्वा कन्स्ट्रक्शन तर्फे पार्टनर, निळकंठ एन शिंदे, रा. २०१, एफ बळवंत अपार्टमेंट, राजारामपुरी, कोल्हापूर यांचे रिसनं 1823,1822/1,1822/2,18223,1822/4,1822/5 या मालमत्तेचे मुल्यांकन किंमत ४ कोटी ११ लाख ७९ हजार ३३८ रुपये इतकी असून यापेक्षा कमी बोली स्विकारली जाणार नाही.
लिलाव मंजूर अंतरावर पूर्ण केला जाईल, ज्यांच्या नावे लिलाव पूर्ण होईल त्याने १/४ रक्कम तात्काळ भरावयाची आहे, लिलाव मंजूर झाल्यानंतर लिलाव धारक यांना समज दिल्यापासून तीन दिवसात उर्वरित 3/4 रक्कम जमा करावयाची आहे, रक्कम जमा न केल्यास फेरलिलाव केला जाईल त्यात बोली कमी आल्यास अशी कमी पडणारी रक्कम पूर्वी जमा केलेल्या १/४ रकमेतून वजा केली जाईल, थकबाकीदाराने लिलाव पुकारल्यानंतर ३० दिवसाच्या आत संपूर्ण थकबाकी, नोटीस फी, लिलाव पुकारलेचा खर्च इत्यादी खर्च जमा करुन लिलाव रद्द करण्यास सक्षम अधिकाऱ्याकडे विनंती केल्यास लिलाव ज्याचे नावे मंजूरी अंतरावर पूर्ण केला आहे. त्यास बोली रक्कमेच्या ५ टक्के रक्कम मानधन म्हणून अदा करावी लागेल. सक्षम अधिका-याकडून लिलाव मंजूर झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र दिले जाईल त्या आधारे लिलाव धारकास मिळकतीचा प्रत्यक्ष ताबा देण्यात येईल.