नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीने उतरली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी बवाना मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रविंदर कुमार इंद्राज यांच्या प्रचाराची जबाबदारी शिंदे गटाचे खा. नरेश म्हस्के यांच्यावर सोपवली आहे.
खा.नरेश म्हस्के यांनी मतदारसंघातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या भेटी घेत दिल्ली विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीच्याच उमेदवाराला प्रचंड बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. दिल्लीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचार, ढिसाळ कारभार आणि केवळ प्रसिद्धीसाठी योजना राबवण्याची आश्वासन देण्यात आली. कोणत्याही प्रकारचा ठोस विकास झालेला नाही. पाणीटंचाई, वाहतूककोंडी, महिलांच्या सुरक्षेचा अभाव, वाढता वायूप्रदूषणाचा धोका या सर्व समस्या वाढतच गेल्याचे खा. म्हस्के यांनी सांगितले.
याच पार्श्वभूमीवर, बवाना मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी खा. नरेश म्हस्के मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या भेटी घेत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहेत येत्या ५ तारखेला दिल्लीमध्ये कमळाचे फूल उमलणार अशी आशा देखील त्यांनी व्यक्त केली.