विद्यार्थ्यांकडून नागरिकांना सुरक्षा नियमांची पथनाट्याद्वारे जनजागृती

Maharashtra WebNews
0



डोंबिवली, (आरती परब) : ३५ वा रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अनुषंगाने काल डोंबिवली (पूर्व), रामनगर परिसर या ठिकाणी सकाळी प्रगती कॉलेज एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी डोंबिवली पश्चिम दीनदयाळ चौक या ठिकाणी संध्याकाळी मॉडेल कॉलेजचे एन.एस.एस.च्या विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षे बद्दल पथनाट्याद्वारे नागरिकांना वाहतूक नियम व अपघाताची आवश्यक माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

यासमयी डोंबिवली शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोह गांगुर्डे, पोह सुधाकर कदम, पोना गणेश कोळी, वार्डन निलेश येवले कुणाल पवार हे त्या ठिकाणी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)