अमेरिकेतील १५७ भारतीय स्थलांतरित आज अमृतसरला पोहोचणार


नवी दिल्ली :  डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने अवैध स्थलांतरितांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. याचा फटका भारतीय नागरिकांना मोठ्या प्रमाणात बसत आहे. दरम्यान, भारतीय स्थलांतरितांची १५७ जणांची तिसरी तुकडी रविवारी संध्याकाळपर्यंत अमृतसरला पोहोचणार आहे. त्यापैकी बहुतेक हरियाणातील नागरिक आहेत. या संध्याकाळपर्यंत  अमेरिकन लष्करी विमानामार्फत अमृतसर विमानतळावर  उतरविण्यात येणार आहे. 


 शनिवारी संध्याकाळी ११७ भारतीयांना अमेरिकेतून लष्करी विमानातून भारतात आणण्यात आले होते. निर्वासित ११७ पैकी ६५ पंजाबचे, ३३ हरियाणाचे, आठ गुजरातचे, तीन उत्तर प्रदेशचे, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानचे प्रत्येकी दोन आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी एक होते. अमेरिकेतून अवैधरित्या भारतात आलेल्या भारतीय स्थलांतरितांना परत आणणारी विमाने अमृतसर विमानतळावर उतरत आहेत. 


मात्र, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यासाठी अमृतसर विमानतळाचा वापर करण्यावर आक्षेप नोंदविला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले, हद्दपार करण्याच्या हेतूने व्हॅटिकन सिटीमध्ये विमान उतरवण्याची परवानगी कोणालाही दिली जाईल का? अमृतसर हे पवित्र शहर आहे. भाजप जाणूनबुजून अमृतसरची बदनामी करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 



Post a Comment

Previous Post Next Post