उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात 'कॉमन मॅन दिन' साजरा



ठाण्यातील विविध क्षेत्रातील ६१ सामान्य नागरिकांचा सन्मान 

युवासैनिकांचा स्तुस्त्य उपक्रम 


ठाणे : शिवसेनेचे मुख्यनेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज ६१ व्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मागील अडीच वर्षात जनतेसाठी दिवसरात्र काम केल्याने जनतेने त्यांना कॉमन मॅन ही पदवी दिली. त्यामुळे रविवारी ठाण्यातील उपवन येथे युवासेनेच्यावतीने 'कॉमन मॅन दिन' म्हणून साजरा करण्यात आला.  याप्रसंगी ठाण्यातील विविध क्षेत्रातील ६१ सामान्य नागरिकांचा सन्मान परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याहस्ते करण्यात आला.




ठाण्यातील उपवन अ‍ॅम्फी थिएटर येथे पोस्टमन,भाजीवाले, पोलीस कर्मचारी,रिक्षाचालक, महिला रिक्षाचालक, वॉर्डबॉय, सफाई कर्मचारी, पंडित, वारकरी, डिलेव्हरी बॉय, कुली अशा विविध क्षेत्रांतील ६१ सामान्य नागरिकांना गौरवण्यात आले. हा गौरव म्हणजे सामान्य व्यक्तीतील असमान्य शक्तीचा आणि त्यांची समाजाप्रति असलेल्या बांधिलकीचा असल्याचे मत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले. त्याचबरोबर या स्तुस्त्य उपक्रमाद्वारे युवासैनिकांनी शिवसेनेची सर्वसामान्य जनतेशी असलेली नाळ अधिक घट्ट केली. याबद्दल नक्कीच एकनाथ शिंदे यांना सर्व युवासेनेचा अभिमान वाटेल असे गौरवोद्गार काढले. यावेळी माजी नगरसेविका परिषा सरनाईक, युवासेना कार्याध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्यासह युवासेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 






Post a Comment

Previous Post Next Post