लोकमान्य नगर आणि सावरकर नगरमधील पाणीटंचाई दूर होणार


केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून जलकुंभाचे खासदारांच्या हस्ते भूमिपूजन 


ठाणे : केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून नव्याने उभारण्यात येणाऱ्या जलकुंभाचे भूमिपूजन रविवारी खासदार नरेश म्हस्के यांच्याहस्ते संपन्न झाले. हा जलकुंभ केवळ पाण्याचा साठा करणारा प्रकल्प नसून, ठाणेकरांच्या जलसमृद्ध भविष्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. अमृत योजनेंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी ठाणे महानगरपालिकेस देण्यात आल्याची माहिती खासदार म्हस्के यांनी दिली.



ठाण्यातील लोकमान्य नगर आणि सावरकर नगरमधील पाणीटंचाई लक्षात घेता, स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के, कांचन चिंदरकर आणि हनुमंत जगदाळे यांच्या अथक प्रयत्नांतून हा प्रकल्प साकार होत आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर होत असून अनेक भागांमध्ये पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात होत होता. परिणामी नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. मात्र, आता या नव्या जलकुंभामुळे या परिसरातील नागरिकांना नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठ्याचा मोकळा झाला आहे. 




या कार्यक्रमादरम्यान, स्थानिक नागरिकांनी पार्किंग आणि पोलीस स्टेशनसंदर्भातील समस्या खासदारांसमोर मांडल्या. या अडचणींना गांभीर्याने घेऊन, तातडीने महानगरपालिका अधिकारी आणि पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधत या समस्यांवर लवकरच ठोस उपाययोजना राबवण्यात याव्यात अशी सूचना खा. म्हस्के यांनी केली. ३६५ दिवस शिवसेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकांसाठी झटत असतात. केवळ राजकारणासाठी नव्हे, तर जनतेच्या सेवेसाठी शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता अहोरात्र कार्यरत असल्याचे सांगत त्यांचे खासदार म्हस्के यांनी कौतुक केले. यावेळी कोपरी-पाचपाखाडी शहरप्रमुख राम रेपाळे, ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे, स्थानिक नगरसेवक दिलीप बारटक्के, नगरसेवक एकनाथ भोईर, कांचन चिंदरकर,नगरसेविका राधाबाई जाधवरताई तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





#Nareshmhaske #eknathshinde #bhumipujan #population #watersupply #publicservices #shivsena #thane

Post a Comment

Previous Post Next Post