दिवा, (आरती परब) : रक्तदान श्रेष्ठ दान असे म्हटले जाते. शिवसेना दिवा शहर अंतर्गत उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी उपमहापौर रमाकांत मढवी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगरसेवक दिपक जाधव यांच्या सौजन्याने बेडेकर नगर येथील शाखा क्रमांक 1 चे प्रमुख योगेश कारंडे यांच्या देखरेखी खाली रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिरासाठी डोंबिवलीतील चिदानंद रक्त पेढीची संपूर्ण टीम आली होती. त्यावेळी नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे 120 जणांनी रक्तदान केले. हे रक्तदान 10 ते 2 वेळेत होते. यावेळी महिलांनी ही रक्तदान केले. यावेळी माजी नगरसेवक दिपक जाधव, विभाग प्रमुख शशिकांत पाटील, शाखा प्रमुख गणेश गायकवाड, दत्तराज कोटगी यांनी या शिबिराला भेट दिली.
हे शिबिर पार पडण्यासाठी शाखा प्रमुख योगेश कारंडे, माहिला शाखा संघटिका सौ. कोमल कारंडे, कृष्णा खांदारे, पुंडलिक बामणे, जगदीश घाडी, महेंद्र शिंदे, दाजी माडगे, मंगेश हाप्पे, शिवा माशाळे, शिवदेश खेरे, दिनेश नमसळे, जयवंत पवार, संदीप सोलकर, बाळकृष्ण येरम, अनिल घाडी, उत्तम मने, समीक्षा येरापल्ले, वैशाली शेलार, दिशा बाने, माधुरी टेमकर, सुजाता पवार, अशिनी जाधव, नम्रता येरम, स्वाती घाडी या सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी, महिलांनी खुप मेहनत घेतली.