१२वीच्या परीक्षेत कॉपीवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथकांची नियुक्ती

Maharashtra WebNews
0


 कल्याण- डोंबिवली महापालिका क्षेत्रातील शाळांवर तसेच महाविद्यालयांवर प्रशासनाची करडी नजर

कल्याण ( शंकर जाधव ) : कल्याण - डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये तसेच महाविद्यालयात इयत्ता १२वीच्या परिक्षा सुरू होत आहेत. यासाठी इयत्ता १२वीच्या परीक्षेत बसणा-या कॉपी बहाद्दर विद्यार्थ्यांवर करडी नजर ठेवण्याकरीता महापालिका आयुक्त डॉ.इंदु राणी जाखड यांच्या निर्देशानुसार व शिक्षण विभागाचे उपआयुक्त संजय जाधव यांच्या नियंत्रणाखाली ३ बैठे पथक व २ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.


महानगरपालिका क्षेत्रात इयत्ता १२ वीच्या परीक्षा सुरळीत पार पडण्याच्या दृष्टिकोनातून मागील काही वर्षात ज्या शाळांमध्ये कॉपीचे प्रकार घडले आहेत, अशा ठिकाणी विशेष बैठे पथक नियुक्त केले आहेत. तर प्रशासन अधिकारी रमेश चव्हाण व शिक्षण अधिकारी विजय सरकटे यांचे नियंत्रणाखाली फिरते पथक कार्यरत आहे. यामुळे कॉपी करणाऱ्यांवर आळा बसेल.महापालिका आयुक्त डॉ इंदु राणी जाखड यांनी बारावीच्या परीक्षेस सामोरे जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना उज्वल यशासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)