कल्याण-डोंबिवली महानपालिकेच्या तिजोरीत ५०२ कोटीची रक्कम जमा


अभय योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद 

कल्याण, ( शंकर जाधव ) : मालमत्ता कर व पाणीपटटीची थकबाकी असलेल्या नागरिकांसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने दि.१४ डिसेंबर २०२४ ते दि. ३१ जानेवारी २०२५ या कालावधीत अभय योजना २०२४-२०२५ जाहिर केली होती. त्यास नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. या कालावधीत एकूण ३३७१९ थकीत करदात्यांनी या योजनेचा लाभ घेतला असून, एकूण रु.२६४ कोटी वसूल झाले आहेत. कर वसुलीपोटी रक्कम रु.५०२ कोटी इतकी रक्कम जमा झालेली आहे.


थकीत मालमत्ताधारकांनी मालमत्ता कराचा भरणा तातडीने व वेळेत करावा अन्यथा कराचा भरणा करण्यास टाळाटाळ मिळकतधारकांची नळजोडणी खंडीत करणे, मालमत्ता जप्ती करणे, अटकावणी करणे, मिळकतीचा लिलाव करणे यासारखी कठोर कारवाई महानगरपालिकेमार्फत करण्यात येणार आहे. मोठी थकबाकी असलेल्या मिळकतधारकांना महानगरपालिकेने वेळोवेळी दिलेल्या नोटीसीला प्रतिसाद न दिलेल्या मिळकतींची जप्ती करण्यात आलेली असून, त्यातील १६ मालमत्तांचा जाहिर लिलाव करण्याची कार्यवाही सुरु आहे.


'मालमत्ता कर' थकविणाऱ्या मालमत्ताधारकांविरुध्द, कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेतर्फे वसुलीची कटू कारवाई टाळण्याकरीता नागरिकांनी मालमत्ताकराचा भरणा त्वरीत करून महापालिकेस सहकार्य करावे असे, आवाहन मालमत्ता कर विभागामार्फत करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post