स्वराज्य ग्रामसंघ कुणे -उसर येथे उमेद मैत्री मेळा हा कार्यक्रम संप्पन

Maharashtra WebNews
0

 


रायगड/ धनंजय कवठेकर  : जिल्हा व्यवस्थापन कक्ष रायगड तालुका व्यवस्थापन कक्ष अलिबाग अंतर्गत स्वराज्य महिला ग्रामसंघ कुणे-उसरकडून, उमेद मैत्री मेळा हा महिलांसाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

हा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे पार पडला. कार्यक्रमाचे उदघाटन स्वराज्य ग्रामसंघ अध्यक्ष कल्पिता शिंदे यांच्या हस्ते सरपंच अजय नाईक ग्रामपंचायत सदस्य सुचिता म्हात्रे, विशाखा गायकर ,ग्रामसंघ पदाधिकारी जिया धसाडे, सुप्रिया धसाडे, समीक्षा मांडे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला वंदन करून तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून करण्यात आले.

महिलांच्या कार्याचा सन्मान करत त्यांच्या योगदानाची दखल घेण्यात आली .क्रीडा ,सामाजिक ,उद्योग ,कृषी ,सेवा या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिलांना स्वराज्य यशस्विनी पुरस्कार आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

लखपती दीदी महिलांना सुध्दा सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले . स्त्री शक्तीचा गजर व जागर , स्नेहभोजन , सांस्कृतिक तसेच विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

आदिशक्तीचे रूप असलेल्या स्त्रियांमध्ये सर्व विश्व सामावले आहे .स्त्रीयांमुळे च विश्वाची निर्मिती झाली आहे अशा या स्त्रीत्वाचा गौरव व्हावा यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता असे आभार प्रदर्शन करतावेळेस सांगितले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)