१८ शाळांना दीड कोटी रुपयांचे साहित्य वाटप
अंबरनाथ \ अशोक नाईक: कौलारू पारंपरिक शाळांमधील वर्ग खोल्यांचे वातावरण हळूहळू बदलून गेले. पूर्वी भिंतीवर लाकडी फळे, चॉकबोर्ड आणि चार्टसचा समावेश होता. सध्याच्या डिजिटल युगात नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वर्ग खोल्यांसाठी 'डिजिटल बोर्ड' एक अभूतपूर्व शोध म्हणून समोर आले आहेत. त्या अनुषंगाने ठाणे जिल्हा वार्षिक योजना २०२४-२५ अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण मिळावं या उद्देशाने शुक्रवारी २८ मार्च रोजी स्थायी समिती सभागृहात कोकण शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आणि मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड यांच्या हस्ते इंटरॅक्टिव्ह पॅनलचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी स्थानिक आमदार डॉ. बालाजी किणीकर उपस्थित होते.
अंबरनाथ नगरपालिकेच्या १८ शाळांपैकी एक माध्यमिक शाळा असून या १८ शाळांमधील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देता यावं या उद्देशाने प्रत्येक शाळेला इंटरॅक्टिव्ह पॅनल, प्रिंटर, प्रोजेक्टर आणि माईक सिस्टीमसह २ लाख १४ हजार रुपयांचे साहित्य असे एकूण १ कोटी ५० लाख रुपयांचे साहित्याचे वाटप करण्यात आले.आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या प्रयत्नाने सर्व शाळा सेमी इंग्रजी झाल्या व आज डिजिटल ही झाल्या.
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन ७५ टक्के आणि अंबरनाथ नगरपालिका २५ टक्के या माध्यमातून अंबरनाथ नगरपालिकेच्या १८ शाळांना १ कोटी ५० लाख रुपयांचे इंटरॅक्टिव्ह पॅनल साहित्य दिलेले आहे या डिजिटल साहित्याच्या माध्यमातून सर्व शाळा डिजिटल झाले आहेत. या साहित्यामुळे ज्या वेळेला वर्गामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल, त्यावेळी शिक्षकांना अत्यंत प्रभावीपणे अध्यापन आणि विद्यार्थ्यांना गतीने अध्ययन होणार आहे सुलभतेने विद्यार्थ्यांना शिक्षण आणि आनंददायी शिक्षण कसे देता येईल याकरिता या इंटरॅक्टिव्ह पॅनल चा उपयोग होईल असा विश्वास शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी शिक्षण विभागाच्या प्रशासकीय अधिकारी जयश्री धायगुडे , अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड, शिवसेना शहर प्रमुख श्रीनिवास वाल्मिकी, माजी नगरसेवक रवींद्र करंजुले, शिवाजी गायकवाड, मुनेश चुग,शिवसेनेचे सचिन गुडेकर, आबा महाजन, आंब्रेश गौडा, उद्योजक विकास कानडे,युवासेनेचे हेमंत जाधव, चंद्रकांत मोटे, समीर देसाई, शुभम जाधव,तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे पदाधिकारी सदस्य व शिक्षक बंधू,भगिनी उपस्थित होते.