डोंबिवलीतील दुकानात दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट




डोंबिवली ( शंकर जाधव ) :  दुकानात चार्जिंग बॅटरीला आग लावून दुकान जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास डोंबिवली पश्चिमेकडील जुनी डोंबिवली गिरीजामाता मंदिराजवळील उमेश निवासमधील दुकानात येथे घडली. या घटनेची माहिती भाजपा पदाधिकारी कृष्णा पाटील यांना नागरिकांनी माहिती दिल्यानंतर पाटील यांनी अग्निशमन दलाला संपर्क साधून माहिती दिली. तात्काळ अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी पोहोचले. अग्निशमन दलाच्या जवानांनी काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. कृष्णा पाटील व नागरिकांनी उमेश निवासमधील राहिवाशांना घराबाहेर पडण्यास मदत केली.




गाळ्यात दुचाकीची गाडीची बॅटरी चार्जिंगकरता लावली होती.अचानक बॅटरीची चार्जिंगचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नसली तरी गाळा जळून खाक झाला.




Post a Comment

Previous Post Next Post