राणे प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन कोरगावकर यांचा उपक्रम
दिवा \ आरती परब : दिव्यातील विवेक मेमोरियलच्या आस्था हॉस्पिटल मध्ये कुडाळ- मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना व नर्स, आया, मावशी यांना राणे प्रतिष्ठानचे ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन कोरगावकर यांच्या तर्फे फळे वाटप करण्यात आली. त्यावेळी राणे प्रतिष्ठान ठाणे जिल्हाध्यक्ष नितीन कोरगावकर, भाजप दिवा मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, किरण कोरगावकर, अनंत पडेलकर, कमलाकर पाटील, ज्ञानेश्वर गावडे उपस्थित होते.