महापालिकेच्या विविध प्रभागात थकबाकी पोटी मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई सुरूच !


कल्याण \ शंकर जाधव :  (प)३/क प्रभाग क्षेत्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील मालमत्ता कराची रक्कम थकीत असलेल्या मालमत्तांना वारंवार नोटीस देऊन सुद्धा मालमत्ता कराचा भरणा करीत नसल्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. इंदू राणी जाखड यांचे निर्देशानुसार कर संकलन विभागाच्या उपायुक्त स्वाती देशपांडे -कुलकर्णी ,३/क प्रभागाचे सहा. आयुक्त धनंजय थोरात व अधीक्षक बळवंत बजागे यांच्या पथकाने रक्कम रुपये २६२८५६५/- इतक्या रकमे पोटी मालमत्ता सील करण्याची धडक कारवाई दिवसभरात केली. 

यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समिती येथील १८ गाळे सील करण्यात आले. १/अ प्रभागातील सहा.आयुक्त प्रमोद पाटील यांनी रु. २,९०, ००० /- इतक्या थकबाकी पोटी १० सदनिका व चार दुकाने सील करण्याची कारवाई केली.

५/ ड प्रभागात सहा आयुक्त उमेश यमगर यांनी रुपये २,१९,३८०/- इतक्या थकबाकी पोटी त्यांनी युनियन बँकेचे एटीएम सील करण्याची कारवाई केली.  


 जे प्रभाग येथील काटे मानिवली तिसगाव या भागातील मालमत्ता करा कराच्या रुपये ११,४५,२४१/- थकबाकी पोटी मालमत्ता सील व नळ कनेक्शन खंडित करण्याची कारवाई ४/जे प्रभागाचे सहा आयुक्त सचिन तामखडे व त्यांच्या पथकाने केली तसेच तिसगाव ,नेतिवली या परिसरातील मालमत्ता कराच्या रु ७,४६,१६६/- थकबाकी पोटी सील करण्यास कर्मचारी गेले असता संबंधितांनी पूर्ण रक्कम जमा केली. तसेच गणेशवाडी व कोळसेवाडी या भागातील रक्कम रुपये १,३३,९७८/- थकबाकी पोटी नळ कनेक्शन खंडित केले असता पूर्ण रक्कम संबंधितांकडून भरण्यात आली.


७/ग प्रभागात सहा. आयुक्त संजय कुमावत यांच्या पथकाने श्री गजानन कृपा चाळ, आयरे गाव येथील गाळा नंबर १ रक्कम रुपये १,०६,१४२/- थकबाकी पोटी सील करण्याची कारवाई केली तसेच आयरे गावातील साई सहारा चाळ येथील गाळा क्रमांक ११ व १२ रक्कम रुपये १,२६,३४१/-थकबाकी पोटी सील करण्यात आले. 


सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर व पाणीपट्टी देयके अभय योजनेअंतर्गत भरण्याची अंतिम मुदत ३१ मार् ही आहे ,तरी अद्याप थकीत मालमत्ता कर पाणीपट्टी न भरलेल्या नागरिकांनी अभय योजनेचा आजच लाभ घेऊन भरणा करावा असे आवाहन महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत करण्यात येत आहे.




Post a Comment

Previous Post Next Post