अंबरनाथ \ अशोक नाईक: अंबरनाथमध्ये एकेकाळी काँग्रेसच्या सत्ता काळात झालेल्या शहराच्या विकासात सिमेंट काँक्रीट रस्त्याचा पाया रचला होता. अनेक सामाजिक, सांस्कृतिक वास्तूंचा इतिहास होता. अशा आदर्श विकासाचा ध्यास घेऊन सदैव संपर्कात असणारा... आपल्या हक्काचा माणूस अशी ओळख आपल्या समाजकार्यातून करत,गेली अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षातील कट्टर निष्ठावंत असे अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रोहितकुमार प्रजापती यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ठाणे ग्रामीण जिल्हा काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सायंकाळी परिसरातील हळदीकुंकू समारंभाला मोठ्या संख्येने महिलांनी हजेरी लावली.
अंबरनाथ पश्चिम भागातील अमर सेवा मंडळ जवळ, दुबई कॉलनी, गौतमनगर, बेथल चर्च, स्कूल रोड, येथील काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या हस्ते झाले. यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष केंद्रित करत, शहरात काँग्रेसला पोषक वातावरण असल्याचे चोरघे म्हणाले, शहरातील इतर भागात देखील जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून शहरवासीयांच्या समस्यांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे संघटन आणि नवीन नोंदणी सह जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्व-पश्चिम भागात जलसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनतेच्या समस्या सोडविला जाणार असल्याचे अंबरनाथ शहर ब्लॉक काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष कृष्णा रसाळ पाटील यांनी सांगितले. रोहितकुमार प्रजापती यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे शाल,पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर अनिता रोहित कुमार प्रजापती जाधव यांनी सर्वांचे आभार मानले.


