Bhiwandi : अनधिकृत जाहिराती होर्डिंग/ बॅनर/ पोस्टरवर भिवंडी महानगरपालिकेची कारवाई

 


भिवंडी : शहरातील अनधिकृत जाहिराती होडींग / बॅनर / पोस्टरवर कारवाई करण्याबाबत आयुक्त तथा प्रशासक अनमोल सागर यांनी सर्व संबंधित प्रभाग अधिकारी यांना आदेश दिले होते.  त्यानुसार अतिक्रमण विभागाचे उपायुक्त विक्रम दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व अनधिकृत जाहीरातीवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. त्यानुसार दि. २३ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान विशेष मोहीम हाती घेण्यात आली व त्यामध्ये प्रभाग समिती क्र. १ ते ५ मध्ये एकूण २७१ बॅनर्स, २१७ पोस्टर्स, ३५७ विविध प्रकारचे झेंडे असे काढून कोंडवाडा येथे जप्त करण्यात आले आहेत.



यापुढे शहर सौंदर्याकरण अंतर्गत कोणत्याही प्रकारे अनाधिकृत विना परवानगी बॅनर, पोस्टर्स लावण्यात आले तर त्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा ईशारा महानगरपलिका आयुक्त  अनमोल सागर यांनी दिला आहे. या विशेष मोहीमेने सर्व प्रभागांचे प्रभाग अधिकारी, सर्व बिट निरीक्षक यांनी ही मोहीम यशस्विपणे राबविली आहे. यापुढे अनधिकृत बॅनर्स लागणार नाहीत, याची दक्षता नागरिकांनी घेण्याचे निर्देश उपायुक्त विक्रम दराडे यांनी दिले. 






Post a Comment

Previous Post Next Post