ठाणे परिवहनची स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल

Maharashtra WebNews
0


माझी TMT’ अ‍ॅपमधून QR कोड सेवा सुरू 

ठाणे (प्रतिनिधी) : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या ठाणे महापालिकेची परिवहन सेवा अस्मार्ट असल्याचे चित्र पहावयास मिळत होते. मात्र  आता ठाणे परिवहन सेवेने देखील उशीरा का होईना स्मार्ट होण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे ठाणे परिवहनचे मोबाईल ॲप आणि क्यू आर कोड सेवा. प्रवाशांचा प्रवास अधिक त्रासदायक आणि सुट्टे पैशांच्या कटकटीतून सुटका करत  एक नव्या युगाची सुरुवात केली आहे. ‘माझी TMT’ मोबाईल अ‍ॅप आणि QR कोड सेवा या उपक्रमामुळे डिजिटल माध्यमातून तिकीट बुकिंग, वेळापत्रक तपासणी, मार्ग निवड आणि तक्रार नोंदणी यासारख्या सुविधा मिळणार आहेत. 


सेवेची रूपरेषा ?

  • ठाणेतील प्रमुख बसस्थानकांवर आणि TMT बसगाड्यांमध्ये QR कोड लावण्यात आले आहेत.
  • प्रवासी या कोडला मोबाईलमधून स्कॅन करून थेट ‘माझी TMT’ अ‍ॅप डाऊनलोड करू शकतात.
  • अ‍ॅपमधून ऑनलाईन तिकीट बुकिंग, बसची लाईव्ह लोकेशन, बस वेळापत्रक, मासिक पास खरेदी, व तक्रार नोंद यांसारख्या सुविधा मिळणार आहेत.
  • ही सेवा सध्या ठाण्याच्या ५० पेक्षा अधिक बसस्थानकांवर आणि २५० बसगाड्यांमध्ये सुरू करण्यात आली आहे.

‘माझी TMT’ अ‍ॅपच्या प्रमुख सुविधा
  • कॅशलेस तिकीट बुकिंग: ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट मिळते; सुट्या पैशांचा त्रास नाही.
  • बस ट्रॅकिंग: GPS प्रणालीद्वारे बस कुठे आहे, किती वेळात येईल, हे मोबाईलवर पाहता येते.
  • डिजिटल पास: मासिक व वार्षिक प्रवास पास मोबाईलवरूनच काढता येतात.
  • तक्रार व्यवस्थापन: अ‍ॅपमधूनच तक्रारी नोंदवता येतात व त्यावर प्रतिसादही मिळतो.

या उपक्रमासाठी झालेला खर्च
  • २०२० मध्ये ठाणे महापालिकेने शहरातील ५० प्रमुख बसस्थानकांवर डिजिटल डिस्प्ले बोर्ड्स बसवण्यासाठी ₹४.७ कोटी रुपयांचा खर्च केला होता.
  • या बोर्ड्सवर QR कोड्सही देण्यात आले होते, जे ‘माझी TMT’ अ‍ॅप डाउनलोड करण्यासाठी वापरले जात आहेत.
  • याशिवाय, 250 बसगाड्यांमध्ये GPS यंत्रणा बसवून, सगळ्या बससेवेवर नियंत्रण ठेवण्यासाठी हजुरी येथील कमांड आणि कंट्रोल सेंटर कार्यरत आहे.

TMT प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, “ही सेवा डिजिटल भारताच्या दिशेने एक पाऊल असून, भविष्यात आणखी सुधारित सुविधा अ‍ॅपमध्ये समाविष्ट करण्यात येतील. आमचा उद्देश म्हणजे प्रवाशांचा वेळ, पैसा आणि अनुभव या तिन्ही गोष्टींची बचत करणे हा आहे.



Post a Comment

0Comments

Post a Comment (0)