डोंबिवलीत मतीमंद तरुणीवर अत्याचार; रिक्षाचालक गजाआड

Maharashtra WebNews
0


डोंबिवली \ शंकर जाधव  :  डोंबिवलीत एका ३१ वर्षीय मतीमंद तरुणीवर लैगिक अत्याचार केल्याचा प्रकार डोंबिवलीत आहे. या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक करून गजाजाड केले.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,फैजल खान असे अटक केलेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ७ तारखेला पीडित गतिमंद तरुणीला  कल्याण ग्रामीण परिसरातील सोनारपाडा परिसरात एका नातेवाईकच्या घरी जायचे होते. तिथे जाण्यकरता पीडित गतिमंद तरुणीने रिक्षा पकडली.

रिक्षाचालक फैजलने याचा फायदा घेत तिला सोनारपाडा येथे न सोडता मुंब्रा येथील निर्जनस्थळी नेले. त्याठिकाणी पीडित तरुणीवर लैंगिक अत्याचार केला. काही तासानंतर त्या तरुणीने घडलेल्या प्रकाराबद्दल तिच्या नातेवाईकांना सांगितले. घटनेची माहिती मिळताच पीडित तरुणीच्या आईने ९ एप्रिल रोजी टिळकनगर पोलीस ठाण्यात रिक्षाचालक फैजलविरोधात तक्रार दाखल केली होती. पोलीस ठाण्यात फैजलविरोधात गुन्हा नोंदवून त्याचा शोध सुरु केला. सोनारपाडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. पोलीस तपासात फैजल रिक्षाचा नंबर हाती लागला.


कल्याण परिमंडळ -3 चे पोलीस उपायुक्त अतुल झेंड, सहायक पोलीस आयुक्त ( डोंबिवली विभाग) सुभाष हेमाडे आणि टिळकनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु झाला.सीसीटीव्ही तपासताना पोलिसांना त्या  रिक्षा चालकाचा नंबर सापडला.त्या नंबरच्या सहायाने फैजलचा त्याचा पत्ता देखील पोलिसांच्या हाती लागला. ९ एप्रिल रोजीच्या रात्री पाेलिसांनी आरोपी फैजल खान याला दिवा येथून अटक केली आहे.गुरुवारी दुपारच्या सुमारास  फैजल खान याला टिळकनगर पोलिसांनी कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने फैजलला १४ एप्रिल रोजीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.




Post a Comment

0Comments

Post a Comment (0)