मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डोंबिवलीत अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले
डोंबिवली \ शंकर जाधव : जम्मू - काश्मीर मधील पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात डोंबिवलीतील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी यांना आपला जीव गमवावा लागला. यांचे पार्थिव डोंबिवलीतील भागशाळा मैदान येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार रविंद्र चव्हाण,आ. राजेश मोरे, आ. सुलभा गायकवाड यांनी पार्थिवांचे अंतिम दर्शन घेऊन सर्व पीडित कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना आधार दिला.
यावेळी शहीदांच्या नातेवाईकांसह नागरिकांनी पाकिस्तान मुर्दाबाद, भारतमाता की जय अशी घोषणा दिल्या. जात- धर्म विचारून हिंदूना आतंकवाद्यांनी गोळ्या मारल्या, मुख्यमंत्री साहेब आमची तुम्हाला हात जोडून विंनती आहें कीं त्या आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा द्या'अशी मागणी केली.