डोंबिवलीतील तीन जणांचा मृत्यू
डोंबिवली \ शंकर जाधव : काश्मीरच्या पहलगाम येथील बैसरन व्हॅली येथील दुर्दैवी आणि भ्याड अतिरेकी हल्ल्यात डोंबिवली पश्चिमेतील तीन मराठी युवक मारले गेले. संजय लक्ष्मण लेले ( ५२ ) राहणार विजयश्री अपार्टमेंट,सुभाष रोड, नवापाडा, हेमंत जोशी ( रा. सावित्री बिल्डिंग, भागशाळा मैदान, डोंबिवली पश्चिम व अतुल मोने ( रा. श्रीराम अंचल, सम्राट चौक, डोंबिवली पश्चिम ) हे तिघे एकत्र आपल्या कुटुंबीयांसोबत काश्मीर पर्यटनासाठी गेले होते. संजय लेले यांचे पुत्र हर्षल लेले वय वर्षे २० याला अतिरिक्यांची गोळी हाताच्या बोटाला लागून किरकोळ जखमी झाले. संजय यांची पत्नी कविता, अतुल यांची पत्नी अनुष्का व १६ वर्षाची मुलगी रुचा व हेमंत जोशी वय यांची पत्नी मोनिका व १५ वर्षांचा मुलगा ध्रुव असे ६ जन सुखरुप आहेत, परंतु दुर्दैवाने एकाच कुटुंबातील ३ डोंबिवलीकर मात्र या हल्ल्यात शहिद झाले.
या परिस्थितीत कुमार हर्षल लेले या २० वर्ष्याच्या युवकाने सर्व गांभीर लक्षात येताच आपले दुःख गिळून या तीनही कुटुंबीयांना संभाळून अगदी धीराने आलेल्या संकटाचा सामना करत आहे. त्याच्या समोर त्याचे वडील व २ यांना निर्दयी अतिरेक्यांनी गोळ्या घातल्या, हॉस्पिटल, पोलीस यंत्रणा,शवागृह, पोस्ट मार्टम या सगळ्या बाबी धीरोधात्तपणे सामोरे जाऊन तो व त्यांचे आई,मावशी व भावंडे अशी कुटुंबीय काश्मीरमध्ये अनोळखी ठिकाणी संकटाशी सामना करत आहे.भारत सरकार, भारतीय सैन्यदल, स्थानिक प्रशासकीय अधिकारी, नागरिक मदत करत आहे. त्याचबरोबर खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी त्यांचे स्वीय सहाय्यक अभिजित दरेकर यांना श्रीनगरला रवाना केले होते व सर्वोतोपरी मदत करण्यास सांगितले आहे, राजेश कदम यांच्यासह इतर लेले व मोने कुटुंबीय सुधा बुधवारी पहाटे श्रीनगरला रवाना झाले होते. त्यांच्यासोबत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची एक टीम पुढील मदतीसाठी गेली होती.
डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण,कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघांचे आमदार राजेश मोरे आणि ठाणे जिल्हा अधिकारी शिनगारे, कल्याण प्रांत गोसावी,डीसीपी अतुल झेंडे, कल्याण तहसीलदार, हे देखील या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात होते. निष्पाप पर्यटक नागरिकांवर झालेल्या अतिरेकी हल्यात तीन निष्पाप, साधे, सामान्य कुटुंबीयातील डोंबिवलीकर उमदे तरुण गमावून बसलो व त्यांचे कुटुंबीय पोरके झाले. हा काळा दिवस डोंबिवलीकर कायम लक्षात राहील.
ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांच्या नातेवाईकांसाठी मदत कक्ष
जम्मू-काश्मिरमधील पहलगाममध्ये बुधवारी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर भ्याड हल्ला केला. दहशतवाद्यांच्या गोळीबारात अनेक पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश आहे. याप्रसंगी ठाणे जिल्ह्यतील ४० पर्यटक तेथे होते. या हल्ल्यात डोंबिवली शहरातील नवापाडा, पांडुरंग वाडी आणि नांदिवली परिसरात राहणाऱ्या हेमंत जोशी, संजय लेले आणि अतुल मोने या तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून इतर ३७ पर्यटक सुरक्षित आहेत. मृतांच्या नातेवाईकांना सर्व प्रकारची मदत तत्परतेने करण्यासाठी जिल्हा प्रशासन पूर्णतः कार्यरत आहे.
ठाणे जिल्ह्यातील पर्यटकांची दुपारी २ वाजेपर्यंत प्राप्त माहिती पुढीलप्रमाणे:-*
अनुष्का मोने (35 वर्षे), ऋचा मोने (18 वर्षे), मोनिका जोशी (45 वर्षे), ध्रुव जोशी (16 वर्षे), कविता लेले (46 वर्षे), हर्षल लेले (20 वर्षे), भुषण अशोक गोळे (39 वर्षे), ज्योती अशोक गोळे (36 वर्षे), आरव भुषण गोळे (8 वर्षे), विनोद विश्वास गोळे (41 वर्षे), माधुरी विनोद गोळे (41 वर्षे), विहान विनोद गोळे (11 वर्षे), स्वाती विश्वास गोळे (36 वर्षे), अतुल प्रकाश सोनवणे (42 वर्षे), प्रियंका अतुल सोनवणे (34 वर्षे), अनन्या अतुल सोनवणे (12 वर्षे), अर्णव अतुल सोनवणे (8 वर्षे), नंदकुमार म्हात्रे (65 वर्षे), निलिमा म्हात्रे (65 वर्षे), निशांक म्हात्रे (31 वर्षे), प्रमदा पाटील (30 वर्षे), सुजन पाटील (63 वर्षे), आशा पाटील (60 वर्षे), नेहा ठाकूर (35 वर्षे), मनोज ठाकूर (39 वर्षे), विहान ठाकुर (07 वर्षे), संजय म्हात्रे (58 वर्षे), स्वाती म्हात्रे (49 वर्षे), नेत्रा भूषण पांगेरकर (37 वर्षे), भूषण इंद्रनाथ पांगेरकर (40 वर्षे), इंद्रायणी इंद्रनाथ पांगेरकर (65 वर्षे), श्लोक भूषण पांगेरकर (12 वर्षे), विहान देवेन ढोलम (05 वर्षे), गौरव सांगळे (37 वर्षे), दिपाली सांगळे (35 वर्षे), स्वाती सांगळे (40 वर्षे), वेद सांगळे (07 वर्षे), शुभ क्षीरसागर (10 वर्षे), मनाली प्रणय ठाकूर (28 वर्षे), प्रणय ठाकूर (29 वर्षे).
या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ने नागरिकांना आवाहन केले आहे की, पहलगाम येथे आपल्या जिल्ह्यातील कोणी व्यक्ती असल्यास किंवा आपल्या ओळखीतील कोणी नातेवाईक किंवा व्यक्ती असल्यास त्याची माहिती तात्काळ 9372338827 / 7304673105 या क्रमांकांवर जिल्हा प्रशासनास कळवावी.
त्याचप्रमाणे श्रीनगरमध्ये पर्यटकांसाठी २४x७ मदत कक्ष सुरू करण्यात आला असून जिल्हा मुख्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयात २४ तास कार्यरत असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष आणि मदत डेस्क स्थापित करण्यात आला आहे.
या कक्षाच्या माध्यमातून पर्यटकांना कोणत्याही वेळी मदत मिळू शकेल. त्यांना काही अडचण आल्यास किंवा आपत्कालीन परिस्थितीत ते खालील क्रमांकावर संपर्क साधू शकतात. दूरध्वनी क्रमांक: ०१९४-२४८३६५१, ०१९४-२४५७५४३, व्हॉट्सॲप क्रमांक: ७७८०८०५१४४, ७७८०९३८३९७, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.