अंबरनाथमध्ये पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध

 


युवासेना आणि महिला आघाडीच्यावतीने आंदोलन 


अंबरनाथ \ अशोक नाईक : जम्मू-काश्मीर मधील पहलगाम येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला हा माणुसकीला काळीमा फासणारा असून प्रत्येकाच्या मनाला तीव्र वेदना देणारा आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात सुमारे २८ निरपराधांचा बळी गेला. त्यामध्ये भारतीय पर्यटकांसह काही विदेशी नागरिकांचाही समावेश होता. काश्मीरमधील हा गेल्या सहा वर्षांतील सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला असून दहशतवाद्यांनी गोळ्या घालून पर्यटकांना लक्ष्य केलं.दरम्यान या हल्ल्या प्रकरणी महाराष्ट्रभरात निषेध व्यक्त केला जात असून अंबरनाथ पूर्व येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेना शिंदे गटाच्या वतीने युवासेना आणि महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी 'पाकिस्तान मुर्दाबाद' घोषणा देत, तीव्र निषेध करण्यात आला.



पहलगाममधील ‘मिनी स्वित्झर्लंड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैसरन भागात मंगळवारी दुपारी सुमारे ६ अतिरेक्यांनी पर्यटकांवर हल्ला केला. त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला. या हल्ल्यात अनेक जण गंभीर जखमीही झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.दरम्यान या हल्ल्याप्रकरणी महाराष्ट्रभरातुन निषेध व्यक्त केले जात असून आज अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने पाकिस्तान विरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. ‘पाकिस्तान मुर्दाबाद’च्या जोरदार घोषणा देत संतप्त युवासेना सैनिक रस्त्यावर उतरले होते. या आंदोलनात युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला आघाडीच्या सदस्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर संतप्त जनतेने एकजूट होऊन देशविरोधी कृत्यांचा निषेध करत आंदोलकांनी सरकारकडे कठोर कारवाईची मागणी केली.






Post a Comment

Previous Post Next Post