Bhiwandi : भिवंडीत जागतिक क्षयरोग दिन निमित्ताने कार्यक्रम


भिवंडी :  भिवंडी - निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत क्षयरोग विभागातर्फे "जागतिक क्षयरोग दिन" निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भिवंडी मनपाचे प्रशासक तथा आयुक्त अनमोल सागर, भिवंडी मनपा अति. आयुक्त-१ देविदास पवार, भिवंडी मनपा अति. आयुक्त-२ विठ्ठल डाके यांच्या मार्गदर्शनाने रॅली काढण्यात आली. सदर रॅलीमध्ये बी.एन.एन. कॉलेजचे NCC विद्यार्थी तसेच भिवंडी मनपा अंतर्गत आरोग्य व क्षयरोगावर काम करणारे सर्व स्वयं सेवी संस्था, क्षयरोग विभागचे तसेच पोलीस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


तसेच 'जागतिक क्षयरोग दिन' कार्यक्रम स्व. राजय्या गाजंगी सांस्कृतिक व मंगल भवन, कोंबड पाडा, भिवंडी येथे साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये तीन टी.वी. चॅम्पियन यांनी क्षयरोगाबद्दल आपले मनोगत व्यक्त केले.

आशा वर्कर, NTEP स्टाफ यांनी संगीत गायन, नृत्य तसेच मनोगत प्रस्तुत केले आणि क्षयरोगाच्या जनजागृतीबद्दल रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. तसेच सदर कार्यक्रमामध्ये निक्षय मित्रांचा सन्मान करण्यात आला. 


सदर कार्यक्रमास भिवंडी मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. संदीप गाडेकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच शहर क्षयरोग अधिकारी डॉ. बुशरा सय्यद तसेच भिवंडी मनपा क्षेत्रातील छाती तज्ज्ञ डॉ. विक्रम जैन तसेच डॉ. उजेर मुकरी तसेच डॉ. उज्वला बद्रापुरकर यांनी मोलाचे क्षयरोग विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच खासगी वैद्यकीय व्यावसायिक तसेच केमिस्ट असोसीएशन चे अध्यक्ष, खासगी प्रयोगशाळा तज्ज्ञ, भिवंडी मनपा अंतर्गत आरोग्य व क्षयरोगावर काम करणारे सर्व स्वयंसेवी संस्था व नागरी आरोग्य केंद्राचे सर्व मेडिकल ऑफिसर, आरोग्य विभाग तथा क्षयरोग विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.




Post a Comment

Previous Post Next Post