राज्यस्तरीय पुरुष व महिला कबड्डी स्पर्धेला सुरुवात


श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त व १०० व्या शिवजयंती उत्सवानिमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन 


ठाणे : श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने शताब्दी वर्षानिमित्त  व  १०० व्या शिवजयंती उत्सवानिमित्त ७२ व्या राज्यस्तरीय  पुरुष व महिला गटाची कबड्डी स्पर्धेचे उदघाटन संस्थेच्या भव्य क्रीडानगरीत  नरेश म्हस्के (खासदार) यांच्याहस्ते झाला. यंदा संस्था शताब्दी वर्ष साजरे करीत असल्यामुळे स्पर्धेच्या इतिहासात महिला व पुरुष गटात दोन्ही मिळून १०० संघाचा समावेश करण्यात आला आहे. संस्थेच्या शतक महोत्सवीवर्षानिमित्त छत्रपती पुरस्कार, अर्जुन  मपुरस्कार, दादोजी पुरस्कार व द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त क्रीडापटूंना  सन्मानित करण्यात येत आहे. आज स्पर्धेच्या पहिल्या दिवशी छत्रपती पुरस्कार प्राप्त सुनील जाधव, मेघाली कोरगांवकर म्हसकर, रेबीक्का गवाटे, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी व सुधीर खानोलकर यांचा सत्कार करण्यात आला.     


महिला गटातील उदघाटनीय सामन्यात शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर), शिवशक्ती महिला संघ (धुळे), आकाश स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), स्फूर्ती सेवा मंडळ (ठाणे) या संघानी विजय मिळवीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर , पुरुष गटातील उदघाटनीय सामन्यात श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळ(मुंबई शहर), जॉयकुमार स्पोर्ट्स क्लब (ठाणे), पार्ले स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), ओम वर्तक नगर (ठाणे), नवरत्न क्रीडा मंडळ (ठाणे) या संघानी विजयी सलामी देत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.

 



सदर स्पर्धेच्या महिला गटातील उदघाटनीय सामन्यात  मुंबई उपनगरच्या  आकाश स्पोर्ट्स क्लब  संघाने ठाण्याच्या शिवतेज क्रीडा मंडळाचा  ३३-२३ असा १० गुणांनी पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला . तनिषा भद्रिके व धनश्री कोकाटे यांच्या प्रभावी खेळामुळे आकाश स्पोर्ट्स क्लब  संघाने मध्यंतराला १९-१० अशी आघाडी घेतली.  पराभूत संघाकडून संगम यादव हिने एकाकी लढत दिली. 


महिला गटातील दुसऱ्या सामन्यात  ठाण्याच्या  स्फूर्ती सेवा मंडळाने मुंबई उपनगरच्या टागोर नगर मित्र मंडळाचा  ५८-४४ असा १४ गुणांनी पराभव करीत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.  सदर सामन्यात स्फूर्ती सेवा मंडळाने  मध्यंतराला २९-१५ असा १४ गुणांची आघाडी घेतली . स्फूर्ती सेवा मंडळाच्या दीपाली पागडे हिच्या उत्कुष्ट चढाया केल्या व तिला नूतन चव्हाणने पक्कडीमध्ये उत्तम साथ देत संघास विजय मिळवून दिला. पराभूत संघाकडून दीपाली इंगवले व स्वाती गोगावले यांनी चांगल्या खेळाचे प्रदर्शन केले. 


पुरुष गटातील उदघाटनीय सामन्यात  मुंबई उपनगरच्या ओवळी क्रीडा मंडळाने ठाण्याच्या ग्रीफिन्स जिमखाना संघाचा ३४-२८ असा ६ गुणांनी पराभव केला.  सदर सामन्यात मध्यंतराला ग्रीफिन्स जिमखाना संघाकडे १८-११ अशी ७ गुणांची आघाडी होती.  ग्रीफिन्स जिमखाना संघाच्या  मनीष धनावडेने उत्कृष्ट चढाया करीत संघाकडे मध्यंतरापर्यंत आघाडी घेतली. मध्यंतराला पिछाडीवर असतानाही रितिक सोनावणे व आकाश सकपाळ यांच्या प्रभावी कामगिरीने संघाने विजय खेचून आणला. मध्यन्तरानंतर पराभूत संघाकडून ग्रीफिन्स जिमखाना संघाच्या तेजस कदम ह्यांनी  उत्कृष्ट  खेळ करीत संघाचा पराभव टाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.    


पुरुष गटातील दुसऱ्या सामन्यात   मुंबई शहरच्या श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने मुंबई उपनगरच्या टागोर नगर मित्र मंडळाचा  ४८-३२ असा १६ गुणांनी पराभव केला. सदर सामन्यात मध्यंतराला  श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाकडे २३-१८अशी ५ गुणांची आघाडी तुषार शिंदेच्या उत्कुष्ट चढाईमुळे घेतली. मध्यन्तरानंतर  टागोर नगर मित्र मंडळाच्या  शार्दुलने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण  श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने उत्कुष्ट खेळ करीत सामना एकतर्फी जिंकला. 



पुरुष गटातील तिसऱ्या सामन्यात  ठाण्याच्या जॉयकुमार स्पोर्ट्स क्लब संघाने मुंबई उपनगरच्या हनुमान क्रीडा मंडळाचा ४२-२७ असा पराभव  केला. मध्यंतराला  हनुमान क्रीडा मंडळाकडे  ३०-१० अशी २० गुणांची आघाडी  दित्य चौधरी आणि अमित मुकादम यांच्या अष्टपैलू खेळामुळे घेतली. पराभूत संघाकडून देव गुंजाळ व प्रतीक हेरकर यांनी चांगला खेळ केला. 


 विशेष अतिथी म्हणून गोपाळ लांडगे (कल्याण जिल्हाप्रमुख), सुधीर कोकाटे (माजी नगरसेवक), हेमंत पवार (ठाणे विधानसभा शहरप्रमुख ), सुहास देसाई (अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट) हे उपस्थित होते. त्यांच्याबरोबर संस्थेचे अध्यक्ष सुधाकर मोरे, उपाध्यक्ष सुनील करंजकर , चिटणीस रमण गोरे, उप चिटणीस संतोष सुर्वे, सहाय्यक चिटणीस चिंतामणी पाटील, खजिनदार रिक्सन फर्नांडीस, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस, विशवस्त केशव मुकणे हे उपस्थित होते. 




Post a Comment

Previous Post Next Post