हिंदी भाषेतील मार्गदर्शक फलकाला मनसेने फासले काळे



डोंबिवली \ शंकर जाधव  : महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रातील कल्याण एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामांसंदर्भातील मार्गदर्शक फलक हे हिंदी भाषेतून लावले होते. मनसेच्या वतीने बुधवारी त्या फलकांना काळ फासण्यात आले. यापुढे असे कुठलेही फलक लावताना मराठीचा वापर झाला पाहिजे अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलनाचा इशारा माजी नगरसेवक उप शहराध्यक्ष प्रभाकर जाधव तसेच विभाग अध्यक्ष रोहित भोईर यांनी एमएमआरडीए प्रशासनाला दिला. याप्रसंगी विभागातील सर्व पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post