अंबरनाथ-उल्हासनगरदरम्यानची घटना
अंबरनाथ / अशोक नाईक : अंबरनाथ आणि उल्हासनगर रेल्वे स्थानकादरम्यान एका २५ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून अपघाती मृत्यू झाला. रोहित मगर असे मृत तरुणाचे नाव आहे. तो लास्तकार मधील अशोक सम्राटनगरचा रहिवासी होता.
रोहित मगर हा तरुण अंबरनाथमधून लोकलने उल्हासनगरला प्रवास करत असताना कानसई ते उल्हासनगर दरम्यान लोकलमधून पडून त्याचा अपघातात मृत्यू झाला. दरम्यान शवविच्छेदनासाठी उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात त्याचा मृतदेह नेण्यात आला आहे.
.jpeg)